मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उच्चशिक्षित तरुणीला 16 लाखांना घातला गंडा, 'जीवनसाथी'वरून झाली होती ओळख

उच्चशिक्षित तरुणीला 16 लाखांना घातला गंडा, 'जीवनसाथी'वरून झाली होती ओळख

तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.

तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.

तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.

कल्याण, 9 फेब्रुवारी : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओळख करत विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करण्याचं प्रमाण वाढत आहे. कल्याणमध्येही एका तरुणीच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचं सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाइन फ्रॉड उघडकीस आल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी ही माहिती दिली. पैसे मागताना नेमकं काय कारण सांगितलं? कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणारी एक तरुणी नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. 2017 मध्ये या तरुणीने जीवनसाथी डॉट कॉमवर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. तब्बल तीन वर्षानंतर 2020 नोव्हेंबर मध्ये प्रकाश शर्मा नावाच्या एका तरुणाने या तरुणीला संपर्क साधला. तो युकेमध्ये एमडी डॉक्टर आहे. शर्मा यानं त्या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असं सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंगच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली. जानेवारीमध्ये प्रकाश हा भारतात येणार आहे, असं त्याने त्या तरुणीला सांगितले. हेही वाचा - Valentine Week मधील धक्कादायक बातमी, दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून विवाहितेला मिळाली तालिबानी शिक्षा 23 जानेवारी रोजी प्रकाश शर्मा यानं फोन करून सांगितले की तो दिल्ली एअरपोर्टला आला आहे. मात्र, त्याच्याजवळ गोल्ड असल्याने त्याला कस्टम ऑफिसरनी पकडलं आहे. पैसे भरावे लागतील, आधी त्याने 65 हजाराची मागणी केली. संबंधित तरुणीनं नेट बँकिंगद्वारे प्रकाशला पैसे दिले. त्यानंतर 24 ,25 आणि 26 जानेवारीला काही न काही कारण सांगत प्रकाश शर्मा याने तिच्याकडून जवळपास 16 लाख 50 हजार रुपये घेतले आणि नंतर तो अचानक गायब झाला. आपली फसवणूक झाली असल्याची समजताच त्या तरुणीनं कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी या प्रकरणात तपास सुरू केला आणि आता अखेर गुन्हा दाखल झाला आहे. ऑनलाइन फसवणुकीचा हा प्रकार असल्याने पोलीस तपास करत आहे. मात्र, एका उच्च पदावर असलेल्या तरुणीला सोळा लाखाचा गंडा घातला गेल्यानं कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.
First published:

Tags: Crime news, Kalyan, Matrimonial sites, Online dating, Online fraud

पुढील बातम्या