मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ग्रामपंचायत निवडणूक: सरकारचा मोठा निर्णय, जात पडताळणी अर्जासाठी मुदतवाढ

ग्रामपंचायत निवडणूक: सरकारचा मोठा निर्णय, जात पडताळणी अर्जासाठी मुदतवाढ

जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

मुंबई, 29 डिसेंबर: राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election 2021) रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या अनुषंगानं जात पडताळणीसाठी (caste verification application) अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या जास्त आहे. त्यात ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. यामुळे जात पडताळणी अर्जसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं (Maharashtra Government) घेतला आहे. आज (29 डिसेंबर) व उद्या (30 डिसेंबर) या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. हेही वाचा...ईडीविरोधात लढ्यासाठी संजय राऊत घेणार कायदेशीर सल्ला, सेनेचा मोठा नेता भेटीला! अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले आहेत. सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी व आवश्यकतेनुसार पोलीस विभागास संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. अर्जदारांची संख्या विचारात घेता आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचा टेबल आणि खिडकी वाढणवण्यात यावी. कार्यालय पूर्ण वेळ तसेच सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालय सुरू ठेवावेत, अशा सूचना देखील जात पडताळणी समित्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर पडल्या. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हेही वाचा...SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! पेमेंटसाठी 1 जानेवारीपासून लागू होणार हा नियम असा आहे निवडणूक कार्यक्रम.. -15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध -23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी -31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी -4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी -15 जानेवारी मतदान -18 जानेवारी मतमोजणी
First published:

Tags: Gram panchayat, State goverment

पुढील बातम्या