जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...आम्ही समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार होतो पण.., अजितदादांनी बोलून दाखवली खंत

...आम्ही समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करणार होतो पण.., अजितदादांनी बोलून दाखवली खंत

'आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका पुलाचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं'

'आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका पुलाचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं'

‘आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका पुलाचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं’

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 11 डिसेंबर : ‘समृद्धी महामार्ग काही माझा नाही. पण मला उद्घाटनाचं आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणार आहे. वेळ कमी होणार आहे. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका पुलाचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खंत बोलून दाखवली. अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी समृद्धी महामार्ग उद्घाटनावर आपली प्रतिक्रिया दिली. समृद्धी महामार्ग वर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. उपमुख्यमंत्री गाडी चालवली,ती गाडी कोणाची होती? मुख्यमंत्र्यांच्या गाडीच स्पीड पाहिला का, एका महामार्गावर एक स्पीड दुसऱ्या महामार्गावर वेगळा स्पीड असं कोण ठरवतं माहिती नाही. या स्पीड वरून कोणी कोर्टात जाऊ नये म्हणजे झालं, असा टोलाही अजितदादांनी फडणवीसांना लगावला. ( चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित) ‘समृद्धी महामार्ग माझं नाही. पण मला आमंत्रण आलं आहे. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणार आहे. वेळ कमी होणार आहे. पुढचा टप्पा लवकर होण्या करता काम सुरू आहे. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गाला मदत दिली. आम्ही उद्घाटन करणार होतो पण एका ब्रिजचं काम राहील त्यामुळे नाही करता आलं. या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. काही अडचणी आहेत पण होईल सगळं काम, मोठा रस्ता होतोय, असं अजित पवार म्हणाले. कोणी मोठी व्यक्ती असली की त्याला एक्स वाय सुरक्षा दिली जाते. कुठल्या व्यक्तीवर अशी शाईफेक करू नये,वैचारिक मतभेद असतील. पण कायदा हातात कोणी घेऊ नये. आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही. शाल जोडीतील शद्ब वापरता येतात पण कालची गोष्ट चुकीचीच होती. आपण बोलताना महापुरुष बोलून टाळलं पाहिजे, बोलताना तारतम्य बाळगला पाहिजे, असा सल्लाही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना दिला. (‘मंत्रिपदाची भीक मागितली हे चालेल का? अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल) ‘13 तारखेला बंद व्यवस्थित पार पडावा. मुळात चंद्रकांत दादांना अजिबात चॅलेंज नाही. तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतोय त्यामुळे असं ते बोलत आहेत ते चुकीच आहे, असा टोलाही अजितदादांनी पाटील यांना लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवला आहे. सगळ्या लोकांचा विचार करून निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं तर गनिमी कावाबद्दल सांगेन,असा गनिमी कावा सांगितला तर कर्नाटक पर्यत जाईल ना, असंही अजित पवार म्हणाले. वडिलधारी नेत्यांमध्ये पवार साहेब यांचा उल्लेख होतो,त्याचा उद्या वाढदिवस आहे. गेले 50-60 वर्ष झालं राजकारण समाजकारण केलं. सर्व समाजाला घेऊन काम केलं. कधीही ते डगमगले नाहीत,सत्ता गेली तरी लोकांचे प्रश्न सोडवता राहिले. नात्याने जवळचा असलो तरी कार्यकर्ता म्हणून जवळ त्याचा मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो, आमचा पक्ष त्याच्या मार्गदर्शनाखाली मोठा व्हावा त्यांना शुभेच्छा, असंही पवार म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात