भाईंदर, 16 जून : मुंबई जवळ असलेल्या भाईंदर **(Bhayander)**मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आश्रमामध्ये जेवण बनविण्याचं काम करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला (attack on elderly woman) करण्यात आला आहे. या हल्ल्यात वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. ही महिला 75 वर्षीय असून हल्ल्यात तिच्या अंगावर तब्बल 56 टाके पडले आहेत. भाईंदर पूर्व येथील इंद्रप्रस्थ परिसरात ज्योती आश्रम आहे. या आश्रममध्ये 75 वर्षीय कलावती घोरपडे या वयोवृद्ध जेवण बनवण्याचं काम करतात. मात्र, त्यांच्यावर आश्रमातील एका वृद्धाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कलावती घोरपडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या रामदेव पार्क येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्योती आश्रममध्ये राहणाऱ्या दोन वयोवृद्धांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. हा वाद सोडवण्यासाठी कलावती घोरपडे यांनी मध्यस्थी केली. मात्र, त्याच दरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. वाचा : योगा शिक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल, चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श हा हल्ला इतका भीषण होता की, कलावती घोरपडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या अंगावर 56 टाके पडले आहेत. कलावती घोरपडे यांच्या कुटुंबीयांच्या मते, आश्रमच्या केअरटेकरने आश्रममध्ये केवळ निराधार नागरिकच नाही तर काही मनोरुग्णांना सुद्धा डांबून ठेवण्यात आले आहे. त्यापैकीच एका वृद्धाने कलावती यांच्यावर हल्ला केला. ही घटना 7 जून रोजी घडली. या प्रकरणी कलावती यांच्या नातेवाईकांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अदिक तपास करत आहेत. मात्र, पोलिसांनी या प्रकरणावर कुठलंही भाष्य केलेलं नाहीये. गुजरातमध्ये जन्मदाती आईचं झाली वैरी वडोदरामध्ये एका आईनं आपल्या पोटच्या मुलीवर चाकूनं हल्ला केला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे तब्बल 20 वेळा या निर्दयी आईनं चाकूनं वार केले आहेत. मंगळवारी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला एका महिलेचा फोन आला. त्या महिलेनं पोलिसांना मी माझ्या मुलीची हत्या केली आहे, असं सांगितलं. महिलेचा फोन येताच पोलिसांनी आजवा रोडवरील महिलेच्या निवासस्थानी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्या महिलेची 13 वर्षीय मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.