मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /योगा शिक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी तक्रार

योगा शिक्षकाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी तक्रार

शिक्षकाने तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिक्षकाने तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिक्षकाने तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्‍ली, 14 जून : योगा शिकवणाऱ्या (Yoga Teacher) एका बनावटी शिक्षकाने तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून हा बनावटी शिक्षक तरुणींचं शोषण (Complaint of sexual harassment against yoga teacher ) करीत होता. या शिक्षकाने समुद्राकाठी योगाभ्यास सुरू असताना आणि काही सार्वजनिक ठिकाणीही तरुणींचं लैंगिक शोषण केलं.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती ऑस्ट्रेलियातील क्वीसलँड येथील राहणारी आहे. या व्यक्तीने दोन तरुणींचं लैंगिक शोषण केलं आहे. ज्यांचं वय साधारण 20 वर्षे असतील. आता या प्रकरणात आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या शिक्षकावर आरोप आहे की, त्याने फिटनेसचे प्रकार शिकवण्याच्या नावाखाली महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. आरोपीला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आतापर्यंत दोन गुन्हे समोर आले आहेत.

हे ही वाचा- तंत्र-मंत्राचा अघोरी खेळ;महिलांना चटके दिल्यानंतर मुलाला तळपत्या वाळूत पुरलं

मात्र आरोपी यानंतर जामीनावर बाहेर सुटला आहे. मात्र तो मॅजिस्ट्रेट कोर्टात 28 जून रोजी हजर होईल. आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे की, आरोपीने सर्व गुन्हे क्वीसलँडच्या उत्तरेकडील भागातील समुद्रकिनारी केले होते. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांच्यासोबत अशा प्रकारचं कृत्य झालं असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करा. यासाठी पोलिसांनी टोल फ्री नंबर जारी केला आहे.

First published:

Tags: Crime news, Women harasment