मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भावना गवळींचे राऊतांविरोधात गंभीर आरोप, महिला आयोगाकडे तक्रार करणार!

भावना गवळींचे राऊतांविरोधात गंभीर आरोप, महिला आयोगाकडे तक्रार करणार!

भावना गवळी

भावना गवळी

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई :  शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी नितीन देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.

भावना गवळी यांनी नेमकं काय म्हटलं? 

भावना गवळी यांनी नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांच्यावर पदाधिकाऱ्यांना चिथवल्याचा आरोप केला आहे. मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे. हे कृत्य घृणास्पद असल्याचं म्हणत त्यांच्या कुटुंबियांबाबत असं झालं असतं तर चाललं असतं का? असा सवाल भावना गवळी यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :  त्यांचे चेहरे बघून आता जनता...संदीप देशपांडेंचा पुन्हा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

पोलिसांत तक्रार 

पुढे बोलताना भावना गवळी यांनी म्हटलं आहे की, मी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांच्यावर या प्रकरणात  गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी भावना गवळी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी मी मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे नाव घेऊन लोकसभेत गेलो, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही विकलो गेलो नाही असेही यावेळी भावना गवळी यांनी म्हटलं आहे.

First published: