• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकलीय'; आमदार मिटकरींची खोचक टीका

'भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकलीय'; आमदार मिटकरींची खोचक टीका

Pandharpur Assembly by-election 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून भाजपवर बोचरी टीका केली आहे.

 • Share this:
  पंढरपूर, 03 मे: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur Assembly by-election 2021) पंढरपूरकरांनी राष्ट्रवादीचा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे  (Samadhan Awtade) 3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर विजयी आणि पराजित दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी भारतीय जनता पक्षातील नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्विट करून भाजपवर बोचरी टीका केली आहे. ही निवडणूक भाजपनं मसल आणि मनीपॉवरचा वापर करून जिंकली असल्याचा दावा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक 'धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' अशा स्वरूपाची होती, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी आमदार मिटकरी यांनी दिवंगत नेते भारताना भालके यांची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं की, 'भारतनाना आम्हाला माफ करा, तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशानं हरवलं आहे. पैसा आणि सैनिकांच्या पत्नींचा अपमान करणारी प्रवृत्ती आज जिंकली आहे.' मिटकरी यांच्या खोचक टीकेनंतर  त्यांचं हे ट्विट आता वेगानं व्हायरल होतं असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे ही वाचा-Pandharpur मध्ये भाजपने केली खास व्यूहरचना, राष्ट्रवादीचा असा केला 'कार्यक्रम' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपनं अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत 'तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो' असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: