जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhandara Police : साहेब चोरी झालीय म्हणून पोलिसांना फोन केला अन् पोलिसांनी त्यालाच आत टाकलं

Bhandara Police : साहेब चोरी झालीय म्हणून पोलिसांना फोन केला अन् पोलिसांनी त्यालाच आत टाकलं

Bhandara Police : साहेब चोरी झालीय म्हणून पोलिसांना फोन केला अन् पोलिसांनी त्यालाच आत टाकलं

चोरी झाल्याची खोटी माहिती डायल 112 वर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द येथील तरुणावर पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

भंडारा, 02 ऑक्टोंबर : चोरी झाल्याची खोटी माहिती डायल 112 वर देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द येथील तरुणावर पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही भंडारा जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. विक्की नारायण बन्सोड (29) रा. गोसेखुर्द ता. पवनी असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जाहिरात

काल (दि.01) शनिवारी सकाळी डायल 112 वर गोसेखुर्द येथे चोरी झाल्याचा कॉल आला. पवनी पोलिसांचे पथक तत्काळ गासेखुर्द येथे जाण्यास निघाले. आलेल्या फोनवर संपर्क करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर तो बंद येत होता. काही वेळात पोलीस गावात पोहोचले. कॉल आलेल्या नावावरून पोलीस विक्कीच्या घरी पोहोचले. त्याला विचारपूस केली असता आपण कॉल केला नाही असे सांगितले.

हे ही वाचा :  बीडमध्ये पिता-पुत्राचा प्रताप, महिलांना 36 लाखांचा गंडा, अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मात्र त्याच्या फोनची तपासणी केली तेव्हा डायल 112 वर दोन वेळा कॉल केल्याचे दिसून आले. त्यामुळे विक्कीला काय बोलावे हे सुचेना. चोरीची खोटी माहिती दिल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आपतकालीन परिस्थितीत पोलिसांची मदत मिळावी यासाठी दिलेल्या नंबरचा गैरवापर केल्याने पवनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात

मुंबईतही अशाच घटनेनं खळबळ

गेल्या काही दिवसात मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणत मुलांच्या अपहरणाचे फेक मॅसेज समाज माध्यमातून व्हायरल होत आहेत. याचा वाईट परिणाम आता लहान मुलांवर देखील होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये एका 11 वर्षाच्या विध्यार्थ्यांने शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःचेच किडनॅपिंग झाल्याचा बनाव रचला. यामुळे घाटकोपर पोलोसांची काही तास पळता भुई थोडी झाली. परंतु नंतर हा त्या मुलानेच बनाव केला असल्याचे कबूल केले.

जाहिरात

हे ही वाचा :  देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 11 मुलांसह 26 भाविकांचा जागीच मृत्यू

घाटकोपरच्या अशोक नगर विभागात राहणाऱ्या या 11 वर्षीय मुलाला कमी मार्क्स पडले होते. त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा नको होता. अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर अपहरणाचे फेक मॅसेज त्याने पाहिले होते. मग आपल्याला ही असे किडनॅपिंग झाल्याचे घरच्यांना सांगितले. घरच्यांनी मुलाला सोबत घेऊन घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. मुलाने आपल्याला शाळेत जात असताना दोन जणांनी चालू रिक्षात ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न केला, माझे तोंड दाबले पण मी उडी मारली आणि पळून आलो असे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना ही सांगितले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात