नेहाल भुरे; भंडारा, 08 ऑक्टोंबर : जुन्या वादात बांधकाम ठेकेदार असलेल्या शेजाऱ्याचा दोन भावांनी धारदार सुऱ्याने डोक्यावर व मानेवर सपासप वार करून खून करण्यात आला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील हसाराटोली परिसरात काल (दि.07) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. विजय श्रीराम नखाते (52, रा. हसाराटोली) असे मृताचे नाव आहे. तर गणेश बरेकर (30) व कृष्णा बरेकर (37) हसाराटोली (दोघे रा. हसाराटोली) अशी आरोपी भावांची नावे आहेत.
मृतकाच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींचे दोन दिवसापूर्वी भांडण झाले होते. तुमसर शहराला लागूनच असलेली हसाराटोली येथे शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान स्थानिक बौद्ध विहार जवळ विजयच्या हत्येचा थरार घडला. घटना घडताच परिसरात स्मशान शांतता पसरली होती घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठले.
हे ही वाचा : रस्त्यावर ही चूक करत असाल तर सावधान, पुण्यात फुटबॉलप्रमाणे हवेत उडून खाली कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतक विजय व जवळच हत्येत वापरण्यात आलेले हत्यार आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा बांधकामाचे खाजगी ठेके घेऊन काम करणारा होता. त्यात विजयच्या परिचयाच्या आरोपी कृष्णा व गणेश यांचे कामाच्या ठिकाणी घटनेच्या दोन दिवसा पूर्वी शुल्लक कारणावरू वाद झाला होता. तेच शाब्दिक वाद विकोप्याला जाऊन सदर हत्येचे थरार घडल्याची माहिती मृतकाच्या लहान भावाने व मुलाने पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल पोलीसांनी हत्येची नोंद घेऊन दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.
भंडाऱ्यात दुसऱ्या एका घटनेने खळबळ
भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मागच्या आठ दिवसांपूर्वी काकांचे निधन झाले होते त्यांच्या अस्थि विसर्जनाकरीता आलेल्या पुतण्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये 4 जण वाहून गेले होते यातील तिघे थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी नदीघाटावर काल (दि. 07) दुपारी 12 च्या सुमारास घडली.
हे ही वाचा : घराबाहेर उभ्या असलेल्या बहिणींसमोर भावाला उडवलं; कार अपघाताचा थरारक Video
प्रणिकेत शिवराम पराते (वय 22, रा. सरांडी ता. तिरोडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संस्कृत सोराते (वय 16), रेतन सोरते (वय 17), सुनील पराते (वय 35) तिघेही (रा. देवरी, जि. गोंदिया) असे बचावलेल्या नातेवाईकांची नावे आहेत.