अमित राय/ जबलपूर, 7 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील जबलपूरमधून रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या किनाऱ्यावर बाईक घेऊन उभ्या असलेल्या तरुणाला जलद गतीने येणाऱ्या कारने उडवल्याची घटना घडली आहे. या धडकेनंतर तरुण हवेत उडाला आणि 10 फूट लांब जाऊन पडला. या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे. बाईक स्वाराला धडक दिल्यानंतर कार लाइटच्या पोलला जाऊन धडकली. याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. जो पाहून कोणाचाही थरकाप होईल. जर काही सेकंदापूर्वी हा अपघात झाला असता तर आणखी लोक जखमी होण्याची शक्यता होती. काही वेळापूर्वीच तरुणाची बहीण बाईकवरुन खाली उतरली होती आणि घराच्या दिशेने जात होती. भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO बुधवारी रात्री उशिरा 39 वर्षीय पिंटू बर्मन आपल्या बहिणींसह बाईकवरुन घरी परतला होता. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हे सर्वजणं घराच्या मुख्य मार्गावर आहेत. मात्र ते रस्त्यापासून लांब उभे आहेत. दोन्ही बहिणी बाईकवरुन उतरून दोन पावलं पुढे जातात. तेव्हाच जलद गतीने येणाऱ्या कार चालकाचं नियंत्रण सुटतं. कारने बाईकवर बसलेल्या तरुणाला जबर धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की, तरुण हवेत उडाला आणि 10 फूट लांब जाऊन पडला. यानंतर कार विजेच्या खांबाला धडकली.
मध्य प्रदेशातील जबलपूरमधून रस्ते अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. #MadhyaPradesh #shockingVideo pic.twitter.com/Ud3ZPomCjV
— News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2022
या घटनेनंतर कार चालक घटनास्थळाहून फरार झाले. जखमी पिंटू घराबाहेर पडून रहिला. कुटुंबीयांनी तातडीने आजूबाजूच्या लोकांना बोलावलं आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला हलवलं. मात्र तोपर्यंत बराच वेळ पिंटू जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता आणि कुटुंबीय मदतीसाठी धावाधाव करीत होते.