वॉशिंग्टन, 06 ऑगस्ट: अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson And Johnson Single Dose Vaccine) भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सरकारने या लशीला मंजुरी दिली तर भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवं व्हॅक्सिन असेल. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. भारतामध्ये सध्या कोव्हिशील्ड (Covisheild), कोव्हॅक्सिन (Covaxin), रशियन व्हॅक्सिन स्पूटनिक (Sputnic-V) व्ही, मॉडर्ना (Moderna) च्या साहाय्याने लसीकरणाचे अभियान सुरू आहे. दरम्यान या पाचही व्हॅक्सिन्सचा डबल डोस घ्यावा लागतो.आता जॉन्सन अँड जॉन्सननच्या सिंगल डोस व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली तर हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे.
Johnson & Johnson applies for Emergency Use Authorization (EUA) of its single-dose COVID-19 vaccine to the Government of India pic.twitter.com/oNE7OYuM84
— ANI (@ANI) August 6, 2021
कंपनीने याआधी सोमवारी अशी माहिती दिली होती की, सिंगल डोसच्या व्हॅक्सिन संदर्भात कंपनीकडून भारत सरकारशी चर्चा सुरू आहे आणि याबाबत कंपनी आशावादी आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याने एका वक्तव्यात असे म्हटलं होतं की, जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडने 5 ऑगस्ट रोजी भारत सरकारकडे एकल खुराक असणाऱ्या कोव्हिड-19 व्हॅक्सिनच्या ईयू साठी अर्ज केला आहे.

)







