मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bhandara Rain Update : भंडाऱ्यात वैनगंगा नदीचे रौद्ररुप, 25 गावांचा संपर्क तुटला, 82 मार्ग बंद

Bhandara Rain Update : भंडाऱ्यात वैनगंगा नदीचे रौद्ररुप, 25 गावांचा संपर्क तुटला, 82 मार्ग बंद

भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने आपली धोका पातळी ओलंडली असून शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्याच्या परिणाम भंडारा- तुमसर राज्य मार्गावर झााला आहे. (Bhandara Rain Update)

भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने आपली धोका पातळी ओलंडली असून शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्याच्या परिणाम भंडारा- तुमसर राज्य मार्गावर झााला आहे. (Bhandara Rain Update)

भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने आपली धोका पातळी ओलंडली असून शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्याच्या परिणाम भंडारा- तुमसर राज्य मार्गावर झााला आहे. (Bhandara Rain Update)

  भंडारा, 16 ऑगस्ट : भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने आपली धोका पातळी ओलंडली असून शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्याच्या परिणाम भंडारा- तुमसर राज्य मार्गावर झााला आहे. (Bhandara Rain Update) पुराचे पाणी 3 फूटावर आल्याने तुमसर-भंडारा राज्य मार्ग बंद झाला आहे. या मार्गावर गाड्यांच्या रांगा ही लागला आहे. या पुरपरिस्थीचा  वैनगंगा नदीने आपले पात्र सोडल्याने जवळपास 25 गावांचा संपर्क जिल्हाशी तुटला आहे. तर जिल्ह्यात 82 मार्ग बंद झाले आहेत. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याला जोडणारा राज्य मार्ग बपेरा गावाजवळ 2 दिवसापासून बंद आहे.

  भंडारा जिल्ह्यात तीन दिवस पावसाने मुसळधार पावसाने हजेरी घातले आहे. सध्या पावसाने उसंती घेतली असली तरी वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने नदीने आपले पात्र सोडले आहे. तर माडगी ते ढाबा मार्गांवर पाणीच पाणी असल्याने जवळपास 25 गावांचा संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यात 82 मार्ग बंद झाले आहेत.

  हे ही वाचा : Weather Update: पुण्याला आज धो धो धुणार; राज्यात कुठल्या कुठल्या भागात पावसाचा Alert?

  यात सर्वाधिक मोहाडी तालुक्यातील 27, तुमसर येथील 15,पवनी येथील 10,साकोली 11,लाखनी 7,लाखांदुर 9,व भंडारातील 3 मार्गाचा समावेश आहे. तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याला जोड़नारा राज्य मार्ग बपेरा गावाजवळ 2 दिवसापासून बंद आहे.

  भंडारा शहरातील एकमेव भाजी मार्केट असलेले BTB मार्केट पुराच्या वेढात आले असून तब्बल 3-4 फुटावर पाणी आल्याने  मार्केट बंद करण्याचा निर्णय BTB प्रशासनाने  घेतला आहे. त्यामुळे भंडारा, गोंदिया, नागपूर आणि मध्यप्रदेशाला राज्याला भाजी पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे या जिल्ह्यात व राज्यातील भाजी महागण्याची शक्यता आहे. तर या BTB मार्केटशी जवळजवळ 40 हजार शेतकरी संलग्नित असून या 40 हजार शेतकऱ्याची भाजी पाला खरेदी न झाल्याने भाज्या खराब होण्याची शक्यता आहे.

  भंडारा जिल्हाची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा अखेर नदी फुगली असून आपली धोका पातळी पेक्षा 3 मिटर पाण्यात वाढ झाल्याने भंडारा शहराला पुराचा वेढा घातला आहे. यात विशेष म्हणजे भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी- खमाटा येथे पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला,खमाटा, कपिल नगर,गणेश नगरी आदि शहरालगत च्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्राशसनाने खबरदारी म्हणून येथील लोकांना विस्तापित केले आहे.

  हे ही वाचा : LIVE Updates : पुणेकरांसाठी खुशखबर, पाण्याचा प्रश्न मिटला, खडकवासला साखळी धरणं 99.20 टक्के भरली

  तर जिल्ह्यात भंडारा, तुमसर,मोहाडी तालुक्यात पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल 150 च्या वर कुटुंब सुरक्षित स्थळी हलवविन्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या पानी पातळी स्थिर झाल्याने पुढील संभाव्य धोका सद्धा टळला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर वैनगंगा नदिला नियंत्रित करण्यासाठी गोसिखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे अडीच मिटर ने उघडण्यात आले असून 15 हजार 180 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे 2020 नन्तर पुन्हा 2022 ला पुर परिस्थिति उद्भवली आहे.

  यवतमाळ - दारव्हा मार्ग बंद

  यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या सतत च्या पावसामुळे अडान नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीवर बोरी अरब जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ दारव्हा हा राज्य महामर्ग बंद आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. नदी काठावर असलेल्या शेतातही पाणी शिरल्याने शेतीची कामं खोळंबली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bhandara Gondiya, Rain fall, Rain flood, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या