बीड, 15 डिसेंबर : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. या दिवसात फुलांना मागणी वाढते. लग्नाचा मांडव सजवण्यापासून ते नवरानवरीचा हार, लग्नाची गाडी यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर होतो. सध्या ट्रेंडचा जमाना आहे. त्यामुळे नवनवीन ट्रेंडला फाॅलो करत वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे हार, आणि इतर साहित्य बनवले जात आहेत. नागरिक देखील मोबाईलवर वेगवेगळे फोटो दाखवून हार, वस्तू बनवून घेत आहेत. मंगलाष्टक होताच वधूवर एकमेकांना हार घालतात आणि या सोबतच शुभमंगल पार पडतं. आजकाल तर साखरपुड्यातही एकमेकांना हार घातले जातात. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नासाठी नवरा नवरीचा तसेच इतर सजावटीसाठी पुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यानं फुलांची मागणी वाढली आहे. भाव देखील वाढले आहेत. दर वाढले लग्नसराईमध्ये प्रामुख्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. आता नवनवीन पॅटर्नचे नवरा नवरीचे फुलांचे हार बाजारामध्ये विक्रीसाठी आले आहेत. गेल्या वर्षी गुलाब, शेवंती, जिप्सम, या फुलांचा जोडीचा हार 3 हजार रुपयापर्यंत मिळायला. यंदा त्याचे दर चार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. ट्रान्सपोर्टच्या सुविधाचे दर, अवकाळी पावसामुळे घटलेले उत्पन्न यामुळे फुलांच्या किमतीवर परिणाम झाला आहे. गुलाब 120, शेवंती 70 ते 80, काकडा 400, झेंडू 50 ते 60 रुपये इतका प्रति किलो इतका भाव आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं ‘हाई झुमका वाली पोर’ गाणं कसं सुचलं? पाहा Video नवनवीन पॅटर्नची मागणी निशिगंध, गुलाब, पटेल, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, पंजाबी, जिप्सम, यासह सोशल मीडियावरच्या असणाऱ्या अनेक नवनवीन हारांच्या पॅटर्नची मागणी लग्नासाठी होत आहे. मात्र, या नवीन पॅटर्नसाठी ग्राहकाला अधिकची रक्कम देखील मोजावी लागत आहे. लग्नकार्यासाठी मंगल कार्यालय असो की हॉल किंवा लॉन्सवर फुलांची सजावट करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, यात सध्या आर्टिफिशियल फुलांचा सुद्धा वापर केला जातोय कारण मंडपाला सजावट करायची असेल तर किमान लाख रुपयांच्या घरात ही सजावट जाते. पूर्वी याच सजावटीचा दर 50 ते 60 हजार रुपये इतका होता. Aurangabad : औरंगाबादमधील लग्नांवर विराट-अनुष्काचा प्रभाव, पाहा Video बाहेरून फुलांची आयात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पारंपारिक शेती केली जाते. झेंडू, गुलाब, मोगरा अशा फुलांची शेती खूप कमी प्रमाणात होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठरावीक तालुक्यांमध्ये काही प्रमाणात फूल शेती होते. त्यामुळे फूल शेतीचे जिल्ह्यात प्रमाण कमी असल्याने पुणे, नगर, या या ठिकाणाहून फुलांची आवक बीड जिल्ह्यामध्ये होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.