औरंगाबाद, 14 डिसेंबर : कोणत्याही लग्न समारंभात वधू आणि वर यांच्यासाठी वरमाला ही सर्वात महत्त्वाची असते. ही वरमाला जास्तीत जास्त चांगली असावी, इतरांपेक्षा हटके असावी हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. लग्नाचा सिझन सुरू झाल्यानं सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या वरमाला बाजारात उपलब्ध आहेत. औरंगाबादकरांमध्ये यावेळी विराट-अनुष्का आणि रितेश देशमुख-जेनेलिया यांनी लग्नात वापरलेल्या वरमाला खरेदी करण्याची क्रेझ दिसून येत आहे. दोन वर्षांनी वाढला थाट कोरोना व्हायरसमुळे गेली दोन वर्ष लग्नसमारंभावर कडक निर्बंध होती. आता हे निर्बंध हटवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा लग्न समारंभ मोठ्या थाटात साजरे होत आहेत. या कार्यक्रमांसाठी लॉन, कपडे, खाद्यपदार्थ या प्रत्येक गोष्टी ट्रेंडिगमध्ये असाव्यात असा या मंडळींचा प्रयत्न आहे. विवाह सोहळ्यात मंगलाष्टका पूर्ण होताच वधू आणि वर एकमेंकांना पुष्पहार घालतात. लग्नविधीमधील महत्त्वाच्या असलेल्या या वरमालेसाठी ऐनवेळी धावपळ नको म्हणून अनेक जण वरमालेचे बुकिंग दहा-पंधरा दिवस आधीच करत आहेत. लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेसोबत गिफ्ट द्यायचं? हे पर्याय आहेत बेस्ट, video विराट-अनुष्काचा प्रभाव टीम इंडिया माजी कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. पाच वर्षांनंतरही त्यांनी विवाहाप्रसंगी वापरलेल्या हाराला मागणी असल्याचं विक्रेते सांगतात. त्यासोबतच रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या लग्नातील वरमालेचीही मागणी औरंगाबादकरांकडून होते. किती आहे किंमत? विराट-अनुष्काचा लग्नातील हार तीन हजार, रितेश - जेनिलिया यांच्या हाराची किंमत दोन हजार आठशे, राजाराणी हार सहा हजार, शाही हाराची किंमत आठ हजार इतकी आहे. त्याचबरोबर वधू-वराला हवे तसे हार देखील करून दिले जातात. या हारांची किंमत दोन हजार ते वीस हजार दरम्यान आहे. बांगडी, बाजूबंद, हार आणि बरंच काही… मोत्याच्या दागिन्यांचा थाट अन् लग्नात तुमचीच हवा शिर्डी, हैदराबाद पुणे, अहमदनगर, निजामबाद, नांदेड या भागातून गुलाबाची आवक होत आहे. तर औरंगाबाद शहरातील फुल विक्रेत्यांकडून मराठवाड्यातील शहरांसह मुंबई, पुणे हैद्राबाद या ठिकाणी फुलांची निर्यात होते. ‘लग्नसराईमुळे बाजारपेठेमध्ये फुलांच्या हारांची आणि सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या रात्रंदिवस काम करत आहोत. विराट-अनुष्का, रितेश -जेनिलिया या सेलिब्रिंटींनी लग्नात वापरलेल्या हारांप्रमाणेच दक्षिणात्य चित्रपटातील हारांना देखील सध्या मोठी मागणी आहे,’ अशी माहिती फुल विक्रेते इरफान शेख यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.