मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : बीडमध्ये साकारला जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवीचा आकर्षक देखावा

VIDEO : बीडमध्ये साकारला जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवीचा आकर्षक देखावा

X
न्यू

न्यू गणेश मित्र मंडळाने आगळावेगळा असा जम्मू काश्मीर येथील वैष्णो देवीचा देखावा साकारला आहे. खरोखरच भक्तांना वैष्णो मातेचे दर्शन घेतल्याची जाणीव या देखाव्यातून होत आहे.

न्यू गणेश मित्र मंडळाने आगळावेगळा असा जम्मू काश्मीर येथील वैष्णो देवीचा देखावा साकारला आहे. खरोखरच भक्तांना वैष्णो मातेचे दर्शन घेतल्याची जाणीव या देखाव्यातून होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    बीड : यंदा लाडक्या बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं आहे. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना (Corona) निर्बंधानंतर यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. जिल्ह्यातील गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. विविध गणेश मंडळांनी वेगवेगळे देखावे साकारले असून आकर्षक देखावे पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. (Ganesha festival 2022)

    बीड शहरातील पेठ बीड भागामध्ये 50 ते 60 वर्षांपासून विविध प्रकारचे देखावे साकार करण्याची परंपरा आहे. यावर्षी न्यू गणेश मित्र मंडळाने आगळावेगळा असा जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवी चा देखावा साकारला आहे. खरोखरच भक्तांना वैष्णोमातेचे दर्शन घेतल्याची जाणीव या देखाव्यातून होत आहे.

    देखावा बनवण्यासाठी लागला तब्बल एक महिना

    बीड येथील न्यू गणेश मित्र मंडळाने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध देखावे सादर केले आहेत. तंटामुक्ती गाव, पाणी आडवा पाणी जिरवा, अमरनाथ, असे देखावे साकारले होते. यावेळी वैष्णो देवीचा देखावा साकारला आहे. हा देखावा बनवण्यासाठी एक महिन्यापासून मंडळातील 10 पेक्षा अधिक सदस्यांनी काम केले. या देखावा बनवण्यासाठी खराब पोते, लाल मातीचा चिखल, नारळाच्या शेंड्या, टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला. देखावा बनवण्याचे काम तब्बल एक महिना दिवस रात्र सुरू होते. 

    सिंहाच्या मुखातून देखाव्यामध्ये होतो प्रवेश...

    सिंहाच्या शंभर फूट मोठ्या मुखातून या वैष्णो मातेच्या देखाव्यामध्ये प्रवेश होतो. यामध्ये लाल कलरचा आणि लाल लाईटचा वापर करण्यात आला आहे. लाईटच्या वापराने देखावा अधिकच उठून दिसत आहे. देखाव्याच्या बाजूस धबधबा देखील करण्यात आला असून त्यामध्ये आकर्षक रंगाची लायटिंग केली आहे.

    हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO

    परिवारासोबत हा देखावा पाहण्यासाठी आले. हा भव्य देखावा पाहण्यात मोठा आनंद आला. लहान मुले आणि विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात इथं येत आहेत. धार्मिकतेचे महत्त्व सांगणारा हा देखावा पाहण्याजोगा असल्याचे गणेश भक्त पूजा टवानी यांनी सांगितले.

    हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO

    दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च 

    मागील अनेक वर्षापासून आम्ही विविध सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारे देखावे साकारतो. मात्र, मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे देखावे साकारता आले नाहीत. यंदा वैष्णो देवीचा देखावा साकारला असून भक्तांना देखाव्याच्या माध्यमातून बीडमध्ये वैष्णो देवीचे दर्शन घेता येत आहे. देखावा बनवण्यासाठी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. पुढल्या वर्षी तिरुपती बालाजी देखावा साकार असल्याचे न्यू गणेश मंडळाचे अध्यक्ष गिरीश गिल्डा यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Beed, Beed news, Ganesh chaturthi