रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 1 एप्रिल: एप्रिलचा महिना चालू होताच राज्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या तापमानाचा लोकांना धोका जाणवू शकतो. विशेषत: शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उष्माघाताचा धोका जाणवतो. त्यासाठी उन्हामध्ये फिरायचे असेल तर योग्य ती काळजी घ्यावी लागते. बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका अधिक असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हात काम करताना सावधगिरी बाळगावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये अनेक जण दुपारी बारा वाजायच्या आतच आपली सर्व कामे आपटून घेतात. मात्र मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या तापमानामध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. सध्या बीडचे तापमान 33 अंश पर्यंत पोहोचले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करणे गरजेचे असते. त्यामुळे अनेकदा ग्रामीण भागांमध्ये उष्माघात झाल्याच्या घटना समोर येतात. गेल्या वर्षी देखील अशा घटना समोर आल्या होत्या.
उष्माघात होऊ नये यासाठी करा हे उपाय कुठल्याही ठिकाणी काम करताना किंवा प्रामुख्याने शेतामध्ये काम करताना डोक्यावर रुमाल किंवा टोपी असणे गरजेचे आहे. थंड पेयाचे सेवन किंवा वारंवार पाणी पिणे देखील तेवढेच शरीरासाठी आवश्यक आहे. थोडा काळ जर उन्हामध्ये काम केल्यानंतर सतत काम न करता सावलीमध्ये विश्रांती घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. 45 मिनिटांआधी कळणार विजांचा कडकडाट कुठे होणार, सरकारने केलं खास app लाँच उष्माघात म्हणजे काय? वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार म्हणजे उष्माघात होय. आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान 37 अंश सेल्सिअस (98.6 अंश फॅरनहाईट) असते. हे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदूवर, रक्ताभिसरणावर आणि शरीरातल्या रसांवर (एन्झाइम्सवर) प्राणघातक दुष्परिणाम होऊ शकतात. उष्माघाताची लक्षणे काय? संपूर्ण शरीरच उष्माघाताचे परिणाम विविध लक्षणांद्वारे दाखवण्यास सुरुवात करते. थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बेचैनी वाढते, शरीराचे तापमान वाढते. चक्क बकरा देतोय दूध, नाव आहे बादशाह, किंमत ऐकून व्हाल हैराण, पाहा VIDEO उपचार काय करावेत? एखाद्याला उष्माघातामुळे किंवा अति उन्हामुळे चक्कर आल्यास त्याला सावलीत आणावे. मोकळी हवा पोहोचू द्यावी. ताप वाढत असल्यास गार पाण्याने अंग पुसावे. तहान लागल्यासारखे वाटत नसले तरी पाणी, नारळपाणी थोडय़ा थोडय़ा वेळाने घोट घोट प्यावे. यामुळे अनेकदा बरे वाटते.