जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 45 मिनिटांआधी कळणार विजांचा कडकडाट कुठे होणार, सरकारने केलं खास app लाँच

45 मिनिटांआधी कळणार विजांचा कडकडाट कुठे होणार, सरकारने केलं खास app लाँच

45 मिनिटांआधी कळणार विजांचा कडकडाट कुठे होणार, सरकारने केलं खास app लाँच

विज पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अनेकांना जीव गमवावा लागतो. दरम्यान विजांपासून वाचण्यासाठी तुमचे प्राण वाचू शकतात.

  • -MIN READ Local18 Bihar
  • Last Updated :

सच्चिदानंद (पाटणा), 30 मार्च : ज्यावेळी अवकाळी पाऊस होत असतो त्यावेळी विजांसह गडगडाट होत असतो. दरम्यान अवकाळी पाऊसावेळी शेतकरी आपल्या शेतात काम करत असतो. यामुळे विज पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अनेकांना जीव गमवावा लागतो. दरम्यान विजांपासून वाचण्यासाठी तुमचे प्राण वाचू शकतात. सुरक्षित ठिकाणी जाऊन लोक लपू शकतात. यासाठी बिहार सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने इंद्रवज्र नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे, जे वादळाच्या 40 ते 45 मिनिटांपूर्वी अलार्मद्वारे तुम्हाला माहिती देते.

जाहिरात

या अॅपद्वारे गडगडाट किंवा वीज पडण्याआधी माहिती मिळवण्यासाठी या अॅपचा वापर केला जात आहे. वादळापूर्वी इशारा देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने मोबाइल अॅप विकसित केले आहे. इंद्रवज्र असे या मोबाईल अॅपचे नाव आहे. ते स्मार्ट फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते.

चहा प्या आणि कप खाऊन टाका! शिवाजी पार्कमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, पाहा Video

हे मोबाईल अॅप डाऊनलोड केल्यानंतर, स्मार्ट फोन वापरकर्त्याला सुमारे 20 किमीच्या परिघात गडगडाटी वादळ येण्यापूर्वी सुमारे 40 ते 45 मिनिटे अलार्म टोनसह अलर्ट मिळणार आहे. ज्याद्वारे व्यक्ती सुरक्षित ठिकाणी जाऊ शकते. याचबरोबर कडाक्याची थंडी असेल तरीही याची माहिती मिळणार आहे.

कोल्हापूरचा बासुंदी चहा एकदा पिऊन तर पहा! रात्री देखील असते मोठी गर्दी, Video
जाहिरात

बिहार सरकारचे इंद्रवराज अॅप अँड्रॉईड मोबाइलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन सर्च बारमध्ये तुम्हाला इंद्रवज्र सर्च करावे लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर अॅपला लोकेशनची परवानगी द्यावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात