जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचं फिरणं मुश्किल करु', सरकारला मोठा इशारा

'महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचं फिरणं मुश्किल करु', सरकारला मोठा इशारा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

बीडमध्ये ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 21 ऑगस्ट : “सरकार म्हणून तुम्ही ऊसतोड कामगारांचे प्रश्न गांभीर्याने घ्या. ऊसतोड कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षी जैसे थे आहेत. सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जातोय. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या फायद्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या, ऊसतोड कामगार महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करा. अन्यथा येणाऱ्या काळात सरकारमधील मंत्र्यांचं फिरणं मुश्किल करू”, असा इशारा ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून सरकारला दिला. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून, जिल्ह्यात ऊसतोड कामगाराची नोंदणी सुरू करावी. ऊस तोडणी कामगारांना प्रत्यक्ष लाभ द्यावा. या प्रमुख मागणी घेऊन आणि ऊसतोड कामगारांच्या दशा आणि सरकार विरोध आंदोलन करण्याच्या दिशा ठरवण्यासाठी, बीडच्या माजलगावमध्ये महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने, ऊसतोड कामगार विभागीय परिषदेचे आयोजन 24 ऑगस्ट रोजी करण्यात आलंय. याची माहिती देण्यासाठी बीडच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव बोलत होते. ( राज-उद्धव पुन्हा एकत्र येणार? शर्मिला ठाकरेंनी सांगितलं भविष्य ) आपण जर बघितलं तर सरकारने जी महामंडळाची घोषणा केली आहे, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ऊसतोड कामगारांच्या विम्याच्या प्रश्न, त्यांच्या मुलांच्या वसतीगृहाचा प्रश्न देखील आहे. ऊसतोड कामगार जर सहा महिने कारखान्याला गेला, तर त्याला राशन मिळत नाही. त्यामुळे त्यांना राशन अगोदर दिलं पाहिजे. गर्भाशयाच्या प्रकरणांमध्ये ज्या महिलांना अपंगत्व आलं, त्या महिलांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी मोहन जाधव यांनी केली. “हे सरकार केवळ कामगारांप्रती घोषणा करतंय. मात्र घोषणावर ऊसतोड कामगारांचं भागात नाही. यामुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर आणि महामंडळाच्या कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी ऊसतोड कामगारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जर ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि कामगाराला या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही, तर येणाऱ्या काळात रस्त्यावर मंत्र्यांना फिरू देणार नाहीत. आणि यासाठीचं ऊसतोड कामगारांच्या दशा आणि आंदोलनाच्या दिशांवर भाष्य करण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आलंय”, असं यावेळी ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात