Home /News /maharashtra /

Beed : बीडच्या तरुणीनं छंदातून उभारली अनोखी बीजबँक; ‘कृषी कन्या’ म्हणून नावही कमावले, पाहा VIDEO

Beed : बीडच्या तरुणीनं छंदातून उभारली अनोखी बीजबँक; ‘कृषी कन्या’ म्हणून नावही कमावले, पाहा VIDEO

title=

श्रुतीच्या मनात लहानपणापासूनच झाड आणि फळेफुले याबद्दल एक वेगळे आकर्षण होते. श्रुतीने आपल्याकडील काही बिया वापरुन उर्वरित बिया जवळच्या व्यक्तीला मोफत दिल्या. यातून तिला एक नवीन कल्पना सुचली. त्यानुसार श्रुतीने आपल्याजवळ असलेल्या बिया इतर बियांच्या बदल्यात लोकांना वितरित करण्यास सुरुवात केली.

पुढे वाचा ...
    बीड, 5 जुलै : कोणाला कशाचा छंद (hobby) असेल याचा नियम नाही. वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासणारी मानसं आपल्याला नेहमीच पहावयास मिळतात. बीड मधील 24 वर्षीय मुलीने देखील आपला आगळा वेगळा छंद जोपासत एक दोन नव्हे तर 200 पेक्षा अधिक दुर्मिळ बीजांचा संग्रह बनवला आहे. या अनोख्या संग्रहामुळे बीज कन्या म्हणून या मुलीने नाव लौकीक मिळवला आहे. श्रुती ओझा (Shruti Ojha) असे तीचे नाव असून श्रुतीने  एस.व्ही.एस. सीड बँक (S.V.S. Seed Bank) स्थापन केली आहे. या बीज बँकेमार्फत आजपर्यंत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना टपालद्वारे विविध प्रकारचे बियाणे (Seeds) मोफत वितरित केले आहेत.  श्रुतीच्या मनात लहानपणापासूनच झाड आणि फळेफुले याबद्दल एक वेगळे आकर्षण होते. श्रुतीने आपल्याकडील काही बिया वापरुन उर्वरित बिया जवळच्या व्यक्तीला मोफत दिल्या. यातून तिला एक नवीन कल्पना सुचली. त्यानुसार श्रुतीने आपल्याजवळ असलेल्या बिया इतर बियांच्या बदल्यात लोकांना वितरित करण्यास सुरुवात केली. यातूनच वेगवेगळे बियाणे संकलित करुन छंदाला विस्तारित स्वरूप दिले. यात श्रुतीने सोशल मीडियाचा वापर केला आणि तिच्या प्रयत्नांना यश आले. श्रुतीने 20018 मध्ये एस. व्ही. एस. नावाचे एक फेसबुक ग्रुप तयार केला. या ग्रुपला सुरुवातीला हजार दोन हजार लोक जोडत गेले. याच माध्यमातून तिच्याकडे विविध देशांतील बीज देवाणघेवाण सुरू झाली. आज याच ग्रुपमध्ये 40 हजाराहून अधिक लोकं जोडली गेली असून यात 55 हून अधिक देशातील नागरिकांचा समावेश आहे. ब्राझील, कुवेत, भूटान, आफ्रिका, श्रीलंका अशा अनेक देशात श्रुतीने शेकडो निसर्गप्रेमीपर्यंत अनेक प्रजातीतील बीज पोहोचवण्याचे काम केले आहे.  वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO कुठल्या प्रकारचे बीज? दुर्मिळ बियाणांचे जतन न केल्यामुळे असे बियाणे संपुष्टात येत आहेत. मात्र, श्रुती अशी बियाणांचे संकलन करुन मोलाचे कार्य करत आहे. श्रुतीकडे वालाचे पाच प्रकार आहेत. त्यात जांभळा, पांढरा, काळा, ढबू, चपटी शेंग असे प्रकार आहेत. तांदळात लाल व काळा तांदूळ आहे. काकडीचे 9 प्रकार असून त्यात पांढरी, पिवळी, आंबट, राजस्थानी पोपटी काकडी, आंध्रची काकडी, धारवाड काकडी, जपानी पांढरी काकडी, आफ्रिकन काकडी आहे. नागालँडमध्ये वापरली जाणारी भुत झोलकिया मिरची, आसामचे लिंबू, काश्मिरी लसूण, निळी गुंज, काळा आणि पिवळा धोत्रा अशा बियांचे संकलन केले आहे. यासह भारतात क्वचित दिसणारा पांढरा पळस आहे. चवळीत काळी, लाल, पांढऱ्या रंगाची त्याचबरोबर देशी व बदामी चवळी आहे. याचबरोबर श्रुतीने जांभळी हळद, लाल हादगा, लाल भेंडीही जमवली आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO भारतामध्ये सर्वाधिक बिजांची देवाणघेवाण श्रुतीने बीज देवाणघेवानाचे भारतात एक जाळेच निर्माण केले आहे. राजस्थान, गांधीनगर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मध्य प्रदेश, ओडीसा, अमृतसर, रत्नागिरी, तेलंगणा, मथुरा यासारख्या अनेक राज्यासह शहरात तिने बीज देवाणघेवांचे कार्य चालू केले आहे.
    First published:

    Tags: Agriculture, Beed news, Seed bank

    पुढील बातम्या