मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO

Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO

बीड नगरपरिषदेवर शहरातील अडीच लाख पेक्षा अधिक नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी आहे. दैनंदिन जिवनातील पाणी हा अविभाज्य घटक असून पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. शहरी भागातील लोकसंख्या मोठी असते एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शुद्ध पाणीपुरवठा करणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही.

पुढे वाचा ...
    बीड, 4 जुलै : प्रत्येकाच्या जीवनात पाणी हा महत्त्वाचा भाग आहे. नळाला पाणी आले नाही की लगेच नागरिक अस्वस्थ होतात. नियमित पाणीपुरवठ्यासाठी नगर परिषदेच्या (Beed Municipal Council) यंत्रणेला रोजच्या रोज काम करावे  लागते. पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही यंत्रणा चालते. नळाला येणारे शुद्ध पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर (Water Purification) कसे शुद्ध होते, पाहूया या विशेष रिपोर्ट मधून.  बीड नगरपरिषदेवर शहरातील अडीच लाख पेक्षा अधिक नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी आहे. दैनंदिन जिवनातील पाणी हा अविभाज्य घटक असून पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. शहरी भागातील लोकसंख्या मोठी असते एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शुद्ध पाणीपुरवठा करणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. नगरपरिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा जलशुद्धीकरण केंद्रावर अहोरात्र मेहनत करत असते. तेव्हा कुठे नळाला शुद्ध पाणी येते. केंद्राच्या निर्मितीसाठी 62.63 कोटी खर्च बीड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर नगरपरिषदेअंतर्गत असणारे जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत आहे. 24 एमएलटी पाणी शुद्ध करण्याची क्षमता या जलशुद्धीकरण केंद्राची आहे. अत्याधुनिक उपकरणयुक्त असे हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. 2004 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बीड शहराला स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने हे केंद्र अमलात आणले. जल शुद्धीकरण केंद्राच्या निर्मितीसाठी 62.63 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. वाचा : महाविकास आघाडीत ‘ऑल इज वेल’ नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक 200 एचपीच्या तीन हाय पावर मोटार माजलगाव धरणातून 200 एचपीच्या तीन हाय पावर मोटरीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रावर ताशी 10.50 लाख लिटर पाणी पोहोचवले जाते. एका मोटरच्या माध्यमातून ताशी 3.50 लाख लिटर पाणी केंद्रात येते. जलशुद्धीकरण केंद्रावर सुरुवातीला पाण्यातील मोटरच्या माध्यमातून माती वेगळी केली जाते. त्यानंतर पाणी स्वच्छ करण्यासाठी दर दोन तासाला 20 किलो आलमचा खडा पाण्यात टाकला जातो. तसेच 8 तासाला आठ किलो ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकली जाते. याठिकाणी 24 तासात 225 किलो ब्लिचिंग, तर 240 किलो तुरटीचा वापर होता. पावसाळ्यामध्ये जर गढूळ पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुरटीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यंत्रणा 24 तास कार्यरत पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलचे प्रमाणे महत्वाचे आहे. त्यानंतर पाणी फिल्टर होते. पाणी शुद्धीकरण करण्यासाठी मोठमोठ्या घटकांची गरज भासते. प्रामुख्याने वीज, मनुष्यबळ, यंत्रणा,केमिकल यासाठी मोठा खर्च होतो. जलशुद्धीकर केंद्रावर शुद्ध झालेल्या पाण्याची साठवणूक केली जात नाही. शुद्ध झालेले पाणी 200 एचपीच्या तीन मोटारीद्वारे शहरात पाठवले जाते. ही यंत्रणा 24 तास कार्यरत असते.  वाचा : राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला तीन शिफ्टमध्ये कर्मचारी कार्यरत जलशुद्धीकरण केंद्र तीन ते चार एकर परिसरामध्ये पसरलेले आहे. पाणीशुद्धीकरणात येथील कर्मचाऱ्यांची भुमिका महत्वाची असते. प्रत्येक कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारची जबाबदरी दिलेली असते. तीन शिफ्ट मध्ये हे कर्मचारी काम करतात. एक शिफ्ट ही 8 घंट्याची असते. जलशुद्धीकरण केंद्रावर पाच कर्मचारी काम करतात. 25 एमएलटीचे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र 2 लाख 25 हजार 984 प्रकल्पीय लोकसंख्या गृहीत धरुन 24 एमएलटीचे हे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. मात्र, सध्या शहराची लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता अमृत योजनेअंतर्गत 25 एमएलटीचे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. याचे काम अंतिम टप्यात आलेले असून लवकरच नागरिकांना आणखी शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  विभागाचे उप विभागीय अभियंता  एम.एस. वाघ यांनी दिली. 
    First published:

    Tags: Beed news, Drink water, Freshwater

    पुढील बातम्या