जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO

Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO

Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO

डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला लोकवस्ती आहे. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसतात. “सध्या पावसाचे दिवस असल्याने, येथील कचऱ्यामुळे दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे आम्हाला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. कचऱ्याच्या ढिगार्‍यामुळे आमची मुलं आजारी पडत आहेत. इथं कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी केली जात नाही, हा कचरा इथून उचलण्यात यावा,” अशी मागणी येथील नागरिक करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अकोला, 4 जुलै : जिल्ह्यातील नायगाव परिसरात महानगरपालिकेचे डम्पिंग ग्राऊंड (Dumping ground) आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्याने, आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य (Health) समस्यांमध्ये वाढ होते आहे. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे भलेमोठे ढीग साचले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेल्या कचऱ्यामुळे डेंगू, हिवताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.डम्पिंग ग्राऊंडमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आसिफ खान (Social worker Asif Khan) यांनी सांगितले. “आमची मुलं आजारी पडत आहेत.” डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला लोकवस्ती आहे. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे मोठे ढिगारे दिसतात. “सध्या पावसाचे दिवस असल्याने, येथील कचऱ्यामुळे दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे आम्हाला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. कचऱ्याच्या ढिगार्‍यामुळे आमची मुलं आजारी पडत आहेत. इथं कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी केली जात नाही, हा कचरा इथून उचलण्यात यावा,” अशी मागणी येथील नागरिक करत आहे. वाचा :  महाविकास आघाडीत ‘ऑल इज वेल’ नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक

     “डम्पिंग ग्राऊंडवर वारंवार फवारणी केली जाते”

    शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. नायगाव परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे 11 एकर जागेवर हे डम्पिंग ग्राऊंड आहे. अकोला महापालिकेच्या 120 घंटागाड्यांमार्फत घरोघरी जाऊन हा कचरा जमा केला जातो. जमा झालेला हाच कचरा या ठिकाणी टाकला जातो. या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत भोर येथे प्रोसेसिंग प्लांट सुरु होणार आहे. नायगाव डम्पिंग ग्राऊंडवर वारंवार फवारणी केली जात असल्याचे महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.   वाचा :  राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला “साठलेल्या कचऱ्यामुळे आरोग्यास धोका” पावसाळ्याच्या दिवसात डम्पिंग ग्राऊंडचा कचऱ्याची दुर्गंधी पसरते. यामुळे विविध  साथीच्या आजारांना डोके वर काढले आहे. उलट्या, पोटदुखी, जुलाब, अशा आजारांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आसिफ खान यांनी केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात