मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री साहेब,आम्हीपण ऊस तोडावा का? शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे मुलाचे थेट शिंंदेंना पत्र

मुख्यमंत्री साहेब,आम्हीपण ऊस तोडावा का? शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे मुलाचे थेट शिंंदेंना पत्र

 वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात

वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात

वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 19 ऑक्टोबर : वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधात एका चौथीच्या विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्र लिहून आपली कैफियत मांडली. 'आई-वडिलांप्रमाणे आम्ही देखील ऊस तोडायला जायचे का?' असा सवालच या विद्यार्थ्याने पत्रातून विचारला आहे.

बीडच्या धारुर तालुक्यातील जायभायवाडी येथील ऊस तोडणी मजुराचा असलेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां पत्र लिहिले आहे. हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऊसतोड कामगारांची मुले असताना व इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचे आपल्या पत्रात नमूद केल्याने या विद्यार्थ्यांच्या पत्रा नंतर तरी शिक्षण विभागात पाझर फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

('खिसे कापणारे महाठग', बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर घणाघाती 'प्रहार')

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जिल्हा परीषदेच्या 20 पेक्षा कमी विद्यार्थी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून यांची प्रक्रीया अंतीम टप्प्यात असताना या निर्णया विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायभायवाडी ही आपली शाळा आत बंद होणार असे सांगताच. या शाळेतील आपले गाव जायभायवाडी हे डोंगरातलं गाव या गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा आसल्याने विद्यार्थ्याची शिक्षणाची सोय होते. गावातून इतर ठिकाणी जायचे म्हणाले तर पाच ते सात कि.मी चालत डोंगर चढउतार करत जावे लागते.

(दातांची सर्जरी सुरु असताना गेली लाईट; मंत्री भुमरेंनी तिथेच केला जनरेटर मंजूर)

रस्त्याने असणारे ओढे पावसाळ्यात जाणे येण्यासाठी मोठा अडथळा आहेत. आई-वडील सहा महिने ऊसतोडणीला जातात अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकायचे कसे का शिक्षणापासून आमची पिढी वंचित ठेवायची असा सवाल या चौथीतील चिमुकल्याने केला असून शिक्षणाचा हक्कासाठी तरी शाळा सुरू ठेवावी अशी विनंती या पत्रातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना हे पत्र वाचून तरी दया येणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.

या पेक्षा ही गंभीर परिस्थिती अनेक भागात आहे. शिक्षण हे विकासाचे माध्यम असल्याने या शाळ बंद करू नयेत असा सुर राज्यभरात निघत आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi news