बीड, 11 जून, सुरेश जाधव : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लिंबागणेश गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर धाडशी दरोडा पडला आहे. बँकेचे लॉकर तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. घटनेनं खळबळ घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावात धाडशी दरोडा पडला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे बँकेचे लॉकर फोडून चोरट्यांनी बँकेतील रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रार द्यायला पोलिसांत गेलेली महिला पतीसमोर आरोपीसोबतच फरार; पोलीसही शॉक होऊन बघत राहिलेखिडकी तोडून बँकेत प्रवेश ही बँक दुसऱ्या मजल्यावर आहे. चोरट्यांनी शिडी लावून दुसऱ्या मजल्यावरील खिडकी गॅस कटरच्या मदतीनं तोडली. त्यानंतर त्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेची तिजोरी फोटून चोरट्यांनी बँकेत असलेले दागिने व रोख रकमेवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकारानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.