बीड, 31 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाला आले आहे. पण, या कार्यक्रमाला मुंडे भगिनी अनुपस्थितीत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. स्व.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आणि शिवसंग्राम संघटनेच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर आहे. पण, बीडमध्ये कार्यक्रम असून खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या गैरहजर आहे.
(देशमुख, मलिक आणि राऊतांना का अटक केली? शरद पवार स्पष्टच बोलले)
भाजप पक्ष श्रेष्ठीचे नेते उपस्थित असताना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. आज बीडमध्ये फडणवीस आले असताना मुंडेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.
दरम्यान, या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यक्रत्ये सहभागी झाले आहेत ज्योती मेटे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. प्रत्येक वर्षी स्व.विनायक मेटे याच दिवशी व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच आयोजन करत होते पुढे आता ज्योती मेटे यांनी देखील या व्यसनमुक्ती जनजागृती आयोजन करून विनायक मेटे यांचा वैचारिक वारसा पुढे सुरू ठेवला आहे.
('संसदेत असं चित्र कधी पाहिलं नाही', शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र)
स्व.मेटे साहेबांचा व्यसन मुक्तीचा वारसा पुढे घेऊन जात असताना लोकांनी रैली ला दिलेला उदंड प्रतिसाद ही पोच पावती आहे. त्याच्यामुळे खूप हुरूप आले आहे.आम्ही अगदी जोमाने पुढे घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील व्यसन मुक्ती शपथ दिले जाणार आहे, अशी माहिती डॉ ज्योती मेटे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news