मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कॅशलेस व्यवहारामुळे पाकीटमार गायब; पण नवे फ्रॉड वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी कायम

कॅशलेस व्यवहारामुळे पाकीटमार गायब; पण नवे फ्रॉड वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी कायम

ऑनलाईन फ्रॉड वाढले

ऑनलाईन फ्रॉड वाढले

कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. जे आधीपासून काही बाबतीत हे व्यवहार करीत होते ते आता अधिक प्रमाणात करू लागले आहेत. कॅशलेस व्यवहाराचे फायदे असले तर काही तोटे देखील आहेत.

बीड, 29 ऑगस्ट : नोटाबंदीनंतर सरकारने गावा-गावात डिजिटल (Digital) प्रणालीचा वापर व कॅशलेस व्यवहार (Cashless transactions) करण्याचे धोरण अंगीकारले. त्यानंतर कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. जे आधीपासून काही बाबतीत हे व्यवहार करीत होते ते आता अधिक प्रमाणात करू लागले आहेत. कॅशलेस व्यवहाराचे फायदे असले तर काही तोटे देखील आहेत. चालू वर्षात 251 ऑनलाईन फ्रॉडच्या (online fraud) तक्रारी सायबर विभागाकडे प्राप्त आहेत. यात एकूण 89 गुन्हे दाखल झाले असून यातील 47 गुन्हे सायबर विभागाकडे तपासाला आली आहेत. तर मागील सात महिन्यात विविध प्रकरणात 1 कोटी 37 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची नोंद आहे. आधुनिकतेच्या काळात आता गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग, याच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार केले जात आहेत. पूर्वीच्या काळी असे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. आवश्यक तेवढे पैसे खिशात बाळगावे लागत होते. मग गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारीच्या घटना समोर यायच्या. आता चहाच्या टपरी पासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत ऑनलाइन पेमेंट होऊ लागले आहे. परिणामी पाकीटमारीच्या घटना कमी झाल्या आहेत. 19 पाकीटमारीच्या घटना सध्या बीड जिल्ह्यात पाकीट चोरीचे गुन्हे अगदी कमी झाले आहेत. मात्र, ऑनलाइन फ्राडच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागात देखील आता कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. मागील चार वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये 19 पाकीटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 2019 मध्ये 7, 2020 मध्ये 4, 2021 मध्ये 3, तर 2022 मध्ये 5 घटना समोर आल्या आहेत. ऑनलाईन व्यवहारामुळे बँक खाते रिकामे आज केळीच्या गाड्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत ऑनलाइन व्यवहार होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फोन पे, गुगल पे, पेटीएम, ऑनलाइन बँकिंग असे वेगवेगळे ॲप उपलब्ध आहेत. सर्वत्र कॅशलेस व्यवहार होत असल्याने खिशात पैसे ठेवण्याची गरज कमी पडत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारामुळे बँक खाते रिकामे झाल्याचेही अनेक प्रकरणे होत आहेत.   1 कोटी 37 लाख रुपयांच्या फसवणूक चालू वर्षात 251 ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारी सायबर विभागाकडे प्राप्त आहेत. यात एकूण 89 गुन्हे दाखल झाले असून यातील 47 गुन्हे सायबर विभागाकडे तपासाला आली आहेत. तर मागील सात महिन्यात विविध प्रकरणात 1 कोटी 37 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची नोंद आहे. ग्रामीण भागात ऑनलाईनच्या माध्यमातून गंडा घालण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील सायबर विभाग ऍक्शन मोडमध्ये आला असून धडक कारवाई सुरू केली आहे. हेही वाचा- Ganeshotsav 2022 : भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न'; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला, VIDEO नगदी पैसे बाळगणे कमी डिजिटलचा जमाना असल्यामुळे कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आपल्यासोबत नगदी पैसे बाळगणे आता नागरिक कमी करत आहेत. त्यामुळे पाकीटमारीच्या घटनांमध्ये कमी झालेली आहे.  बीड शहरातील मुख्य बस स्थानकावर सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले असून प्रत्येक छोट्या घटनेवर आमची बारकाईने लक्ष असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांनी सांगितले. हेही वाचा- इथं मिळतात 131 प्रकाराचे पान; Gold च्या किमतीमध्ये होईल वर्षभराचा खर्च, VIDEO गुन्हेगारीचे प्रकार बदलले गुन्हेगारीचे प्रकार बदलले आहेत. अगोदरच्या चोरी हार्ड कॅशच्या व्हायच्या. आता ऑनलाईन गंडा घातला जात आहे. नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये अनोळखी आलेल्या लिंक वर क्लिक करू नये व ओटीपी देखील सांगू नये, असे आवाहन सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी केले आहे. 
First published:

Tags: Beed, Beed news, Crime, Online crime

पुढील बातम्या