मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोदावरी नदी पात्रात असलेले ‘मोरेश्वर’ देवस्थान; पावसाळ्यात मंदिर असते पाण्याखाली, VIDEO

गोदावरी नदी पात्रात असलेले ‘मोरेश्वर’ देवस्थान; पावसाळ्यात मंदिर असते पाण्याखाली, VIDEO

नवसाला पावणारा गणपती म्हणून मोरेश्वर गणपतीची ओळख आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीला भाविक नवसपूर्ती म्हणून येथे दर्शनासाठी पायी वारी करतात.

बीड : महाराष्ट्रात गणपतीची 21 पुरातन तीर्थक्षेत्र आहेत. यातील एक तीर्थक्षेत्र माजलगाव तालुक्यातील गंगामसलामधील मोरेश्वर मंदिर (Moreshwar ganapati Gangamasala) आहे. गोदावरीच्या पवित्र पात्रात अगदी मध्यावर दिमाखात हे मंदिर उभे असून पावसाळ्यामध्ये हे मंदिर पाण्याच्या खाली जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून येथील गणपतीची ओळख आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीला भाविक नवस पूर्ती म्हणून येथे दर्शनासाठी पायी वारी करतात. गणेश कोशातील 21 गणपतीचे महत्त्व आगळीवेगळी आहेत. या 21 गणपतीपैकी एक म्हणजे माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर गणपती. या गणपतीचा उल्लेख भालचंद्र असाही होतो. गोदावरीच्या पवित्र पात्रात अगदी मध्यावर दिमाखात मंदिर उभे आहे. माजलगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर गंगामसला येथे मोरेश्वर गणपतीचे हे मंदिर असून हा गणपती स्वयंभू असल्याने गणेश भक्तांची इच्छा पूर्ण होते. मंदिर गोदावरी नदीच्या मधोमध उभे आहे.  या मंदिराची स्थापना पेशव्यांनी केल्याची आख्यायिका सांगितली जाते. मंदिर पाण्याखाली पावसाळ्यात गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहते. मंदिर अगदी गोदावरीच्या पात्रात मधोमध असल्याने मंदिर पाण्याखाली जाऊन मंदिराचा कळस फक्त उघडा राहतो. नदी पात्रातील पाणी ओसरल्यानंतर गणेशाला महाअभिषेक घातला जातो. जेव्हा मंदिर पाण्याखाली असते तेव्हा भाविक दुरून का होईना कळसाचे किंवा पायऱ्याचे दर्शन घेतात. पूजेचे साहित्य पाण्यात अर्पण करतात. अग्रपूजेचा मान गोदावरीस असतो. गंगामसला नावाचा इतिहास दक्षिणगंगा गोदावरी या गावाजवळून वाहते. त्यामुळेच या गावाला गंगामसला असे नाव पडले असावे. मसला या शब्दाचा अर्थ इथले मंदिर पाहिल्यानंतर उलगडू लागतो. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन माशांची चित्रकार कोरलेली आहेत. हे पूर्वी मत्स्यालय असावे यावरून गावाला गंगामसला असे नाव पडले असावे असे जाणकार सांगतात. मंदिराचे बांधकाम माधवराव पेशव्यांनी केले आहे. पेशवे निजामावर स्वारीसाठी जात असताना वाटेत गोदावरीच्या पात्रात त्यांच्या दलातील एक मोठा हत्ती अडकला. त्यावेळेस पेशव्यांनी श्री गणेशाला प्रार्थना केली आणि  त्यांचा हत्ती मुक्त झाला. परतीच्या प्रवासात निजामांवर विजय मिळवून आल्यानंतर पेशव्यांनी या ठिकाणी मंदिर बांधले. गौतम ऋषींना ओंकार प्रकट झाले… या ठिकाणी गंगथडी असल्याने जमीन सुपीक आहे. या क्षेत्राचे महत्त्व ऐकून पुढे गौतमऋषी येथे आले. त्यांनी येथे ओंकाराचे उग्र तप केला. ओंकार त्यांना प्रसन्न झाले. त्यावेळी गौतम ऋषीने माझे आश्रम सतत विविध प्रकारच्या धन व धान्याची समृद्धी राहू दे, त्यातील कनंग्यामधून कितीही वेळा धान्य काढले तरी एकदाही त्या रिकामे पडू देऊ नको, अशी विनंती केली. आणि तसे झाल्याचीही आख्यायिका येथील जाणकार सांगतात.  गणपतीचे दोन नावे... मोरेश्वर गणेशाला भालचंद्र असेही म्हणतात. हे नाव गणपतीच्या वाहनावरून रुढ झाले. गणपतीचे वाहन मोर आहे त्यामुळे या गणेशाला मोरेश्वर, मयुरेश्वर असेही म्हणतात. गंगामसला हे क्षेत्र पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून प्रवाहातले हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे. त्याचबरोबर या क्षेत्राला भालचंद्रपूर असे नाव मिळाले. गणपतीची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. Shri Moreshwar Mandir
गुगल मॅपवरून साभार
धार्मिक उत्सव  प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीला भाविक नवस पूर्ती म्हणून येथे दर्शनासाठी पायी वारी करतात. संकष्टी व विनायक चतुर्थीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. अंगारकी चतुर्थीला धार्मिक उत्सव असतो. भाविक भक्त पर जिल्ह्यातून इथे चालत येतात. भक्तांसाठी येथे महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते. हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO मंदिराची दिनचर्या मंदिराला दरवाजा नसल्याने मंदिर हे 24 तास भक्तांसाठी उघडे असते. गणेशाची आरती या ठिकाणी म्हणली जाते. दुपारच्या सुमारास नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये खडीसाखर, गुळाचा शिरा प्रामुख्याने असतो. संध्याकाळच्या सुमारास सहा ते सातच्या सुमारास आरती केली जाते. हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO येथे कसे पोहोचाल? माजलगावरून परभणी राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर गंगामसला हे गाव आहे. गावाजवळ मोरेश्वराचे गणपतीचे मंदिर आहे.
First published:

Tags: Beed, Beed news, Temple

पुढील बातम्या