मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Minor Girl Rape : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार, बीडमधील घटनेने संताप

Minor Girl Rape : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार, बीडमधील घटनेने संताप

बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 05 नोव्हेंबर : बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. प्रमोद सोमनाथ सलगर (रा. मुंगी ता. धारुर जि. बीड) असं नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. (दि. 22) ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवून नेले. यानंतर पिडीत मुलगीचा शोध घेण्यात पोलिसांना यश  आले.

हे ही वाचा : बापरे! एकाच दिवसात तीन 'नरबळी', अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना

यादरम्यान पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जाबाबात म्हटलंय की, प्रमोद सलगर याच्या व माझ्यामध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, नमुद गुन्हयात 376 (2) (एन), 376 (2) (जे), 120 (ब) भादंवि सह कलम 4, 6, 17 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 सह कलम 9, 10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहे.

बीडमध्ये पत्नीवर अत्याचार

स्वत:च्याच पत्नीला अनोळखीच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना २६ जुलै २०२२ रोजी घडली. दरम्यान पीडीत पत्नीने याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पतीसह नराधम व्यक्तीविरोधात गुरुवारी (दि.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाशेद इनामदार व नासेर शेख (महिलेचा पती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे ही वाचा : आई-वडिलांनीच काढला आपल्या एकुलत्या एक मुलाचा काटा; त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, २६ जुलै २०२२ रोजी माजलगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नामक व्यक्ती घुसला व त्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता. दरम्यान महिला आरडा ओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडा ओरड केलीस तर तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली व महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला.

First published:

Tags: Beed, Beed news, Rape case, Rape news, Rape on minor