मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आई-वडिलांनीच काढला आपल्या एकुलत्या एक मुलाचा काटा; त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

आई-वडिलांनीच काढला आपल्या एकुलत्या एक मुलाचा काटा; त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

राम सिंह हे एका सरकारी गुरुकुलाचे प्राचार्य आहेत आणि या दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत राहते.

राम सिंह हे एका सरकारी गुरुकुलाचे प्राचार्य आहेत आणि या दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत राहते.

राम सिंह हे एका सरकारी गुरुकुलाचे प्राचार्य आहेत आणि या दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत राहते.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Hyderabad, India

  हैदराबाद, 2 नोव्हेंबर : व्यसनाधीनतेमुळे गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक तरुण व्यसनांसाठी कोणत्याही थरातला जात असल्याचं आपण पाहतो. हैदराबादमधला एक तरुण दारूच्या व्यसनासाठी आपल्या आई-वडिलांना मारहाण करत होता. आपल्या मुलाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनीच त्याच्या हत्येची सुपारी दिली. आपल्या पोटच्या एकुलत्या एक मुलाची हत्या करण्यासाठी या पालकांनी केलेलं हे कृत्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. पोलीस या हत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

  आपल्या मद्यपी आणि बेरोजगार मुलाच्या छळाला कंटाळून सरकारी शाळेचे प्राचार्य आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलाची सुपारी देऊन हत्या केली आहे. शहरातल्या खम्मम भागात ही घटना घडली आहे. आई-वडिलांनी त्रासाला कंटाळून आपल्या एकुलत्या एक मुलाची हत्या करण्यासाठी आठ लाख रुपयांची सुपारी दिली. पोलिसांनी 26 वर्षांच्या साई रामच्या हत्येप्रकरणी चार हल्लेखोरांसह क्षत्रिय राम सिंह आणि राणीबाई यांना अटक केली आहे. हल्लेखोरांवर साई रामचा गळा दाबल्याचा, तर क्षत्रिय राम सिंह आणि राणीबाई यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप आहे.

  बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नाही - 

  18 ऑक्टोबर रोजी सूर्यापेटमधल्या मुसी येथे गळा आवळून हत्या करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली कार ही या कुटुंबाची असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्याच वेळी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी हे जोडपं शवागारात गेलं असता ते ज्या वाहनातून आले होते, तेच वाहन गुन्ह्यासाठी वापरल्याचं स्पष्ट झालं आणि ते पकडले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांचा मुलगा हरवल्याची तक्रारदेखील दाखल केली नव्हती.

  हेही वाचा - मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून चाकूने भोसकले, हत्येचा LIVE VIDEO

  गुरुकुलाचे आहेत प्राचार्य -

  राम सिंह हे एका सरकारी गुरुकुलाचे प्राचार्य आहेत आणि या दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत राहते. पोलिसांनी सांगितलं, की चौकशीदरम्यान या जोडप्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आमचा मुलगा दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, तर आम्हाला मारहाण आणि शिवागाळ करत असे.'

  हुजुराबाद परिमंडळाचे निरिक्षक राम लिंग रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, `मुलाची हत्या करण्यासाठी या जोडप्याने राणीबाई यांचा भाऊ सत्यनारायणकडे मदत मागितली होती. 18 ऑक्टोबरला सत्यनारायण आणि एका मारेकऱ्याने साईरामला कारमधून एका मंदिरात नेलं. तिथं त्यांनी साईरामला खूप दारू पाजली आणि त्यानंतर दोरीने गळा दाबून त्याचा खून केला.`

  First published:
  top videos

   Tags: Crime news, Hyderabad, Murder