मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : 'कोरडे गणपती' नाव कसे पडले माहिती आहे का? रंजक आहे इतिहास

VIDEO : 'कोरडे गणपती' नाव कसे पडले माहिती आहे का? रंजक आहे इतिहास

X
Korde

Korde Ganpati : नवसाला पावणारा गणपती म्हणून कोरडे गणपती ओळखला जातो. हे नाव का पडलं याचा मोठा रंजक इतिहास आहे,

Korde Ganpati : नवसाला पावणारा गणपती म्हणून कोरडे गणपती ओळखला जातो. हे नाव का पडलं याचा मोठा रंजक इतिहास आहे,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    बीड, 7 सप्टेंबर : शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळे गल्ली येथील श्रीक्षेत्र कोरडे गणपतीचा (korade Ganpati) महिमा अगाध आहे. बीड येथील हे प्रसिद्ध मंदिर मानले जाते. कोरडे नावाच्या गणेश भक्ताच्या स्वप्नात गणपतीने जाऊन  मनोकामना पूर्ण केली, अशी आख्यायिका आहे तेव्हापासून या गणपतीचे नाव देखील कोरडे गणपती पडल्याचे येथील जाणकार सांगतात. (Ganesha festival 2022)

    राज्यात सध्या गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी होतो आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणारे धार्मिक स्थळे आहेत. यात बीड देखील मागे नसून बीड जिल्ह्याला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे. शहराला इतिहासकालीन शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक कला, शिल्प आणि हेमाडपंती मंदिर आहेत. कोरडे मंदिराला देखील जवळपास पाचशे वर्ष पूर्ण होत आहेत. नवसाला पावणार गणपती अशी ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी दूरदूरहून भक्तगण येतात.

    आडातील कोनाड्यात मी आहे...

    पाचशे वर्षांपूर्वी बीड शहरातील काळे गल्ली परिसरात कोरडे घराण्याचे अस्तित्व होते. या घराण्यातील एक भक्ताने नामलगावच्या गणपतीला प्रत्येक चतुर्थीला पायी जाऊन दर्शन करण्याचा संकल्प केला. तो अखंडपणे सुरू असतानाच संकट चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त आजारी पडला. वृद्धत्वामुळे भक्ताला नामलगाव येथे असणाऱ्या गणपतीला जाता आले नाही. रात्री भक्ताच्या स्वप्नात जाऊन गणपतीने दृष्टांत दिला. भक्ता काळजी करू नको, मी तुझ्या जवळ आलो आहे, या वाड्याच्या पूर्व दिशेकडील आडातील कोनाड्यात मी आहे, मला वर घे आणि तेथे माझी स्थापना कर, असे गणपतीने सांगितले.

    गणेश मूर्ती आडात सापडली

    आडात शोधाशोध केली असता, आडातील कोनाड्यात गणपतीची मूर्ती शिळेच्या स्वरूपात सापडली. एक मोठी दगडी शीळ असलेली गणेश मूर्ती आडातून बाहेर काढून घरातील मंडळींनी प्रतिष्ठापना केली. पूर्वी या जागेत कोरड्याचा वाडा प्रसिद्ध होता. वाड्यातच आडाच्या शेजारी चार पत्रे असलेल्या शेडमध्ये ही मूर्ती ठेवण्यात आली. कालांतराने येथे भाविकांची गर्दी वाढू लागल्याने गणेश उत्सव सुरू झाला. आज बीड शहरातील मानाचा गणपती म्हणून कोरडे गणेशाला महत्त्व प्राप्त झाला आहे. आजही गणेश उत्सवात कोरडे गणपतीची मिरवणूक सुरू झाल्यानंतर अन्य गणेश मंडळ पाठोपाठ मिरवणूक सहभागी होतात.

    बीड शहरातील जोशी घराण्याने या गणेशाला आपले कुलदैवत मानले आहे. कै. वासुदेवराव काळे,  कै. नारायण काळे आणि जोशी घराण्यातील सर्व भक्तांनी एकत्र येत गणपतीचे नामकरण श्री संस्थान कोरडे गणपती केले आहे.

    मंदिरात  कुठले उत्सव

    संकष्टी चतुर्थीला मंदिरातील दिवा प्रज्वलित करून दीपोत्सव केला जातो. संकट चतुर्थीस रात्री चंद्रोदयाच्या वेळी मंदिरात 51 दिवे प्रज्वलित केले जातात. रात्री दिव्यातून गणेशाचे दर्शन घडते. मुंबईसह पुणे आळंदी नगर येथील भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. गणेश जयंती दिवशी द्वार नावाचा महोत्सव होतो. तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील केली जाते.

    हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO

    मंदिराची दिनचर्या

    सकाळी सहा वाजता मंदिर भक्तांसाठी खुले केले जाते. सकाळी आठच्या दरम्यान पूजा होते. नऊ वाजता आरती होते. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री महाआरती केली जाते. रात्री आठच्या सुमारास मंदिर बंद होते.

    हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO

    मंदिर स्थळी कसे पोहोचाल

    शहरातील राजुरी वेस मार्गे बलभीम चौकातून जुन्या बाजारात गेल्यानंतर एका कमानीतून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आत एका छोट्या गल्लीत कोरडे गणपतीचे मंदिर आहे. मंदिरात नरेंद्र विनायक जोशी (संपर्क क्रमांक- 9890495418) पुजारी आहेत. 

    First published:

    Tags: Beed, Beed news, Culture and tradition, Ganesh chaturthi, बीड, मंदिर