मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅप वापरत असाल तर सावधान; बँकेतील लिपिक महिलेला 1 लाख 17 हजारांचा गंडा

ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅप वापरत असाल तर सावधान; बँकेतील लिपिक महिलेला 1 लाख 17 हजारांचा गंडा

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार आता बीडमधून समोर आला आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार आता बीडमधून समोर आला आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार आता बीडमधून समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड 14 नोव्हेंबर : इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. जग ऑनलाईन होत चाललं आहे. शॉपिंगपासून ते अगदी जेवणाची ऑर्डर देण्यापर्यंत सगळं काही आता ऑनलाईनच होताना पाहायला मिळतं. मात्र, याचे फक्त फायदेच नाही तर काही तोटेही आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार आता बीडमधून समोर आला आहे. यात ऑनलाइन शॉपिंग ॲपकडून गिफ्ट दिले जात असल्याचे सांगत बँकेतील लिपिक महिलेला सव्वा लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला.

ठाण्यात तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 2 हजार रुपयांची बंडल पाहून पोलीसही हैराण

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रियंका कुमारी नवनीत सत्यम असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या बीड शहरातील राजूरीवेस भागातील एसबीआय बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑनलाइन खरेदीसाठी ॲप डाऊनलोड केलं होतं. यातूनच त्यांची फसवणूक झाली.

ॲपद्वारे सतत ऑनलाइन शॉपिंग करता म्हणून तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे. त्यासाठी तुम्हाला 4 हजार 999 रुपयांची शॉपिंग करावी लागेल, असं या महिलेला सांगितलं गेलं. प्रियंका सत्यम यांनी होकार देत 5 हजार 79 रुपयांच्या वस्तूंची खरेदी केली. गिफ्ट घ्यायचे असेल तर जीएसटीची रक्कम असल्याचे सांगून समोरील व्यक्तीने पैसे भरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे एकूण 1 लाख 17 हजार 863 रुपये भरले .

2 राज्यांचे पोलीस शोधत आहेत चोरीला गेलेली चप्पल; नेमकं प्रकरण तरी काय?

हे पैसे भरल्यानंतरही त्यांना काहीही गिफ्ट मिळालं नाही. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच प्रियंका यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. त्यांच्या तक्रारीनुसार चार अनोळखी भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Financial fraud, Online fraud