ठाणे, 12 नोव्हेंबर : ठाण्यामध्ये तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली भागात कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा भारता बाहेरुन आल्याचा संशय पोलिसांना आहे. मिरारोड जवळ एका इनोव्हा कारमध्ये (एच 04 डीबी 5411) बनावट नोटा आणल्या जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. (Video : कॉलेजचे पैसे घेऊन पळणार होता प्राचार्य, पाहा कसा अडकला जाळ्यात?) त्यानुसार, पोलिसांनी माऊली स्नॅक्स कॉर्नर, गायमुख चौपाटी घोडबंदर रइथं सापळा रचण्यात आला. यावेळी राम रही शर्मा (वय 52) राजेंद्र रघुनाथ राऊत (वय 58) या दोघांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले. कारमध्ये पाठीमागच्या शिटखाली 4 खाकी पुढ्याचे बॉक्स ठेवलेले होते. कते उघडून पाहिले असता 2 हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्यात. (चालक ढाब्यावर गेला, चोरट्यांनी कंटेनर खाली केला, तब्बल 9 लाखांची चहापत्ती चोरली!) यावेळी दोघांकडून 2 हजार रुपयांच्या 400 नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांची किंमत 8 कोटी रुपये आहे. या बनावट नोटा वेगवेगळ्या नंबरच्या होत्या, त्या चलनात आणण्याचा दोघांचा डाव होता. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटा कुठून आल्या, इतक्या मोठ्या संख्येनं या नोटांची छपाई कुठे झाली, कुणाला त्या दिल्या जाणार होत्या, याचा तपास पोलीस करत आहे. बनावट बांगड्याद्वारे गंडविले बँकेला दरम्यान, उस्मानाबादमध्ये कर्जदार व मूल्यनिर्धारकाने संगणमत करून बँकेत बनावट सोने ठेवून 2 जणांनी 2 लाख रुपयाचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन आरोपींविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकच्या शाखेत हा प्रकार घडला असून या यातील आरोपीला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.