मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : नव्या वर्षापूर्वी शेतकरी अडचणीत, पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना!

Beed : नव्या वर्षापूर्वी शेतकरी अडचणीत, पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना!

कापसाला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कापसाला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कापसाला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    बीड, 27 डिसेंबर : बीडमधील पांढऱ्या सोन्यासाठी शेती सर्व दूर परिचित आहे. यंदा झालेल्या पावसाने कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसला. कसेबसे सावरून पिकं वाढवली. मात्र, म्हणावं तेवढे उत्पन्न मिळालं नाही. त्यात सध्या बाजारभाव देखील मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील दो महिन्यांपासून दर पडले आहेत. 

    शेतकरी वर्षभर दिवसरात्र एक करत शेतीमध्ये पिकांची लागवड करतात. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले त्यामधून अधिक नफा हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, दोन महिन्यापासून कापसाचे दर वाढत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नसल्याने कापसाचे दर उतरले आहेत. ऑक्टोबरमध्ये बीड जिल्ह्यात सुमारे 10 हजार रुपये प्रति क्विंटल सुरू झालेली कापसाचे खरेदी आता 8 हजार रुपये क्विंटलवर आली आहे. दरम्यान दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेरच काढला नसल्याने जिल्ह्यातील 90% कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे.

    सिद्धेश्वराच्या पायथ्याशी मुळा-प्रवरा-गोदावरीचा संगम, ड्रोनचे नयनरम्य Photos

    कापसाच्या लागवड पेरणीसाठी आणि वेचणीसाठी शेतकऱ्यांचे पैसे तर खर्च झाले आहेत मात्र अद्यापही कापूस विक्री न झाल्यामुळे शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यंदा बीड जिल्ह्यात सुमारे दोन लाख 80 जार हेक्‍टरवरच्या जवळपास कपाशीची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी देखील कापसाची अधिक लागवड केली.

    शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

    बीड जिल्ह्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा केले होते. त्यातच अतिवृष्टीने दिलेल्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र हाता तोंडाशी आलेल्या पिकाची माती झाली त्यातच कपाशीच्या वाती झाल्या. आधीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट असताना यंदा तर, कपाशीला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र दोन महिन्यांमध्ये दोन हजाराने कापसाचे भाव घसरले आहेत.

    वाल्याचा झाला वाल्मिकी! एकेकाळचा गुन्हेगार आता बनला शेतकरी, पाहा VIDEO

    दोन महिन्यात दर पडले

    ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली सुरुवातीला  दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता दरम्यान सुरुवात चांगला दर मिळाल्याने आणखीन वाढेल भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकरी उराशी बाळगून होता ११ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून दर कमी होण्यास सुरुवात झाली. चालू आठवड्यामध्ये जिनिंगवर आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल अशी कापसाचे दर आहेत तर प्रायव्हेट व्यापाऱ्यांकडे आठ हजार रुपये प्रति क्विंटल खरेदी सुरू आहे.

    उत्पन्न घटले भावही मिळेना 

    सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात कापूस खरेदीला सुरुवात झाली मात्र यावर्षी 30 क्विंटल कापूस होईल अशी आशा होती. मात्र, अवकाळी पावसाने कापसाच्या वाती केल्या. अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळाले आहे. यात खर्च अधिक झालेला आहे. यात आता भाव देखील कमी मिळत असल्याने मोठे नुकसान होत असलेल्याचे शेतकरी श्रीकांत गदळे यांनी सांगितले. 

    First published:
    top videos

      Tags: Beed, Local18