औरंगाबाद, 26 डिसेंबर : वयात आल्यावर लग्न झालं लग्नानंतर घर चालवण्यासाठी चोऱ्या करायला लागलो. त्यानंतर लोकांची फसवणूक करायला लागलो. यामुळे पोलीस मागे लागली. रात्रंदिवस जंगलांमध्ये पळू लागलो. एक दिवस असं वाटलं पोलिसांच्या हाती लागावे किंवा आत्महत्या करावी. मात्र, पत्नीने शेती करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर आयुष्याला नवीन दिशा मिळाली. हे शब्द आहेत एकेकाळी गुन्हेगार असलेले आणि सध्या शेती करत आयुष्याची नवीन बाग फुलवणारे आयजी विक्रम चव्हाण यांचे. चला तर त्यांचा गुन्हेगार ते शेतकरी प्रवास कसा झाला या स्पेशल रिपोर्ट मधून जाणून घेऊया. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर तीनशे ते चारशे नागरिकांचं वडजी गाव. गावापासून तीन चार किलोमीटर अंतरावर माळ रानावरती आयजी विक्रम चव्हाण हे कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना वडिलोपार्जित दहा एकर शेती. आयजीचं वयात आल्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर मुलं झाली. पाच मुलं चार मुली असा मोठा परिवार. मग घर चालवण्याची जबाबदारी आल्यानंतर आयजीनी चोऱ्या आणि लोकांची फसवणूक करायला सुरुवात केली. सुरुवातीला चोरीतून मिळालेल्या मुद्देमाला व पैशांमध्ये ते घर चालवू लागले. मात्र, चोरीच्या पैशांमध्ये घर खर्च भागवणे कठीण जाऊ लागलं. तसेच त्यांच्यावर या चोरी आणि फसवुणकीमुळे तीन गुन्हे दाखल झाले. या प्रकारणात काही दिवस तुरुंगवास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शेती करण्याचा सल्ला मानून गुन्हेगारी सोडून शेती करत आयुष्याची नवीन बाग फुलवली आहे. हेही वाचा : Osmanabad : नर-मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी खरं सोन असल्याचं भासवून नागरिकांना खोट सोनू देऊन फसवणूक पैशाची लालूच लागल्यानंतर काय करावे असा प्रश्न पडल्यानंतर नागरिकांना खरं सोन असल्याचं भासवून नागरिकांना खोटं सोन देऊन फसवणूक आयजी विक्रम चव्हाण करायचे. यामधून त्यांना चांगले पैसे मिळायला लागले. मात्र या फसवणुकीच्या धंद्यातून त्यांच्यामागे पोलीस लागायला लागले. पोलीस त्यांचा शोध घेत रात्री अपरात्री त्यांच्या घरावर धाड टाकायला लागले. यामुळे चार चाकी गाडीची किंवा पोलिसांची चाहूल लागताचं जेवणाच्या ताटावरून उठून ते पळत असत. पत्नीला पोलीस दम देत चौकशी करत चोऱ्या करून पोलिसांच्या धाकाने महिनाभर बाहेर राहत होतो. दरम्यानच्या काळामध्ये मुलं सांभाळण्याची जबाबदारी पत्नीवरच असायची. यामुळे एवढ्या मोठ्या मुलांना जेवण खाऊ घालताना त्यांना सांभाळताना तिला देखील परेशानी होत होती. त्यामुळे चोऱ्या करण्याचे सोडून शेतीकडे वळलो असे आयजी विक्रम चव्हाण सांगतात. आयजी घरी नसताना पोलीस शोध घेत घरापर्यंत येत असत. रात्री अपरात्री कुठे आहे तो असं म्हणत दम देत असत. एक दिवस त्यांना देखील हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावा असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत होता. मात्र, त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून त्या सगळं काही सहन करत होत्या असे विक्रम चव्हाण यांच्या पत्नी नर्मदा सांगतात.
हेही वाचा : ‘या’ योजनेतून घ्या 50 लाखांपर्यंत कर्ज; सरकार फेडेल तुमचं व्याज, VIDEO
अशी फुलली आयुष्याची बाग दिवसेंदिवस वय वाढू लागले आणि यामध्ये आयजीना पोलिसांपासून लपण कठीण जाऊ लागलं. यामुळे एकतर पोलिसांच्या हाती लागावं किंवा स्वतःचा आयुष्य संपून टाकावे हे दोनच पर्याय त्याच्यासमोर उभे होते. ही गोष्ट त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितली आणि पत्नीने आपण शेती करू असा सल्ला त्यांना दिला. दोघांनी ठरवलं आणि शेती करायला सुरुवात केली शेतीमध्ये त्यांना उत्पन्न मिळू लागलं आणि हळूहळू आयुष्याची बाग फुलू लागली. आयजी यांच्याकडे आता दहा एकर शेती आहे. बाराशे मोसंबीची झाडे आहेत. ट्रॅक्टर, बैलगाडी, मळणी यंत्र, तीन विहिरी, कोंबड्या, बकऱ्या, बैल, यासारखी संपत्ती त्यांची असून सध्या ते शेती करत आपले आयुष्य जगत आहेत. शेती मधून वर्षांकाठी त्यांना सहा लाख रुपयांचे उत्त्पन्न मिळते.