बीड, 19 डिसेंबर : कचोरीला परिचयाची गरज नाही. हे एक अप्रतिम स्ट्रीट फूड आहे. कचोरी प्रत्येकजण उत्साहाने खातो. कचोरीच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे त्यातील विविधता. कुरकुरीत कचोरी, मसाला कचोरी, कांदा कचोरी, दाल कचोरी आणि मटर कचोरी असे अनेक प्रकार आहेत जे एकाला दुसऱ्यापेक्षा वेगळे करतात. हिवाळ्यात गरमागरम कचोऱ्या खायला खूप मजा येते. बीड मध्ये देखील अशी स्पेशल कचोरी मिळते. बीड शहरातील जालना रोड परिसरामध्ये रघुनाथ जोशी यांनी 1989 च्या सुमारास एक छोट्याशा स्टॉलवर स्वीट मार्ट चा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी बीड शहरात कचोरी या पदार्थांविषयी अनेक लोकांना माहिती नव्हती. शहरांमध्ये प्रथमच हा पदार्थ खवय्यांच्या नजरेत पडला. त्यावेळी दीड रुपया पासून या कचोरीची जोशी यांनी विक्री सुरू केली. कचोरीचा दर आता 12 रुपये नग इतका झाला आहे. राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा, इथं चेक करा तुमच्या शहरातील तापमान असा तयार होतो मसाला सकाळी आठच्या सुमारास पटेल स्वीट होम सुरू होते. या ठिकाणी रघुनाथ जोशी यांचा एक मुलगा, आणि दहा कामगार कचोरी बनवण्याचे काम करतात. विशेष म्हणजे यामध्ये सर्व पदार्थ घरगुती असल्यामुळे ही कचोरी अधिकच चवदार लागते. मुगाची डाळ उडदाची डाळ आणि घरगुती काळा मसाला करून या कचोरीचा मसाला तयार केला जातो. त्यामध्ये कांद्याची पेस्ट आणि लाल मिरचीची पेस्ट देखील टाकली जाते. ‘इथं’ मिळते बांबूमध्ये बनवलेली शाकाहारी बिर्याणी, पाहा काय आहे खासियत video 700 कचोरीची विक्री व्यवसाय ज्यावेळी सुरू केला तेव्हा दिवसाकाठी हजार ते बाराशे कचोरीची विक्री होत होती मात्र, आज घडीला अनेक स्वीट मार्ट शहरांमध्ये सुरू झाले आहेत. त्यामुळे विक्री कमी झाली असून सध्या 600 ते 700 कचोरीची विक्री होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.