बीड, 25 ऑक्टोबर : दिवाळीला सुरुवात झाली आहे. आनंदोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. कलाकारदेखील दिवाळीसाठी खूप उत्सुक आहेत. सिनेअभिनेता आणि हास्यकलाकार संदीप पाठकही त्याची दिवाळी गावाकडे म्हणजेच माजलगावमध्ये साजरी करत आहे. कशी असते संदीपची दिवाळी पाहूयात या रिपोर्टमधून.
मराठी अभिनेता संदीप पाठकने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप टाकली आहे. मातीशी नाळ असलेला हा मराठमोळा कलाकार आपल्या मूळ गावी प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतो. संदीप हा मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगावचा आहे. त्याचे संपूर्ण बालपण हे माजलगावातच गेले. दिवाळीनिमित्त संदीप खास माजलगावला येतो.
दिवाळी म्हटलं तर गावाशिवाय मजा नाही
कर्मभूमी मुंबई असली तर संदीप दिवाळीसाठी आवर्जून गावाकडेच येतो. दिवाळीचा फिल गावाकडे जशी येतो तशी मजा शहरात नसते. शहरात सजावटीसाठी अधिक वाव मिळत नाही. शहरात फटाके फोडण्यासाठी इमारतीतून खाली यावे लागते. त्यामुळे संदीपला गावाकडचीच दिवाळी आवडते. गावाकडे संदीप मस्त घर परिसात दिवे लागतो. सजावट करतो आणि आनंदात दिवाळी साजरी करतो. संदीपने आतापर्यंत एक दोन वर्ष मुंबईतही दिवाळी साजरी केली मात्र, त्याला तेवढा आनंद मिळाला नसल्याचे संदीपने सांगितले.
संदीपाला फराळ कोणाच्या हातचा आवडतो आई की बायको?
आम्ही संदीपला फराळ कोणाच्या हातचा आवडतो हा प्रश्न विचारा तेव्हा संदीपने अगदी हसत उत्तर दिले. संदीप म्हणाला, लहानपणी मी आईला स्वयंपाकात मदत करायचो. लहानपणापासूनच आईच्या हातचे जेवण आणि नवनवीन पदार्थ खात आलेला आहे. दिवाळीतील आईच्या हातचे काही पदार्थ मला खूप आवडतात. मात्र, माझी बायको देखील छान स्वयंपाक करते, असे संदीपने सांगितले.
अवतरली शिवसृष्टी, दिवाळीत साकारला 'प्रतापगड'
लहानपणीची दिवाळी
लहानपणापासूनच संदीप दिवाळीमध्ये धमाल, मस्ती करायचा. त्यावेळीचे दिवस वेगळे होते. म्हणाव्या तेवढ्या सोई सुविधा नव्हत्या. तरीदेखील त्यावेळी दिवाळीत अधिक मजा यायची. आता संदीप मुंबईत असतो. परंतु, दिवाळीत दरवर्षी वेळ काढून गावाकडे येतो, असे संदीपच्या आईने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.