मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Dhananjay Munde accident : धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

Dhananjay Munde accident : धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 4 जानेवारी:  बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे.  मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12 : 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी  

मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

'अफवांवर विश्वास ठेवू नका'

दरम्यान या अपघाताबाबत धनंजय मुंडे यांनी स्वत: माहिती दिली आहे.  'मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये', असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Dhananjay munde