जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड : कंटेनरला धडकली कार, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर कारचालक जखमी

बीड : कंटेनरला धडकली कार, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर कारचालक जखमी

बीड : कंटेनरला धडकली कार, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर कारचालक जखमी

बीड जिल्ह्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 21 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार अपघातात बीड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे बीडचा डोंगरी गावावर शोककळा पसरली आहे. बीड जिल्ह्यातील एकच कुटुंबातील चार व्यक्तीचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे-नगर रस्त्यावर, शिरूर तालुक्यातील कारेगाव जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने कार आदळून भीषण अपघात झाला. मृतांची नावे पुढीलप्रमाणे -  सुदाम शंकर भोंडवे (वय 66), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय 60), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय 32) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय 4 वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

News18

हेही वाचा -  सोलापूर हादरलं! मंगळवेढा येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या तर या अपघातात अश्विन सुदाम भोंडवे (वय 35) हे या अपघातात जखमी झाले. ते कार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे डोमरी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात