पंढरपूर, 21 फेब्रुवारी : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता राज्यातील मंगळवेढे येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवेढा येथे तीन महिलांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नंदेश्वर गावातील या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज दुपारी अज्ञात माथेफिरूने दगड आणि धारदार शस्त्राने ही हत्या केली. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दीपाली माळी, पारुबाई माळी, संगीता माळी असे हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. महादेव माळी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांची आईचे निधन झाल्यावर, आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी महादेव माळी यांच्या बहिणी नंदेश्वर येथे आल्या होत्या. दरम्यान, दगडाने काठीने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. दीपाली बाळू माळी (वय 25) ही महादेव माळी यांची सून आहे. तर पारूबाई बाबाजी माळी (वय 45) आणि संगीता महादेव माळी (वय 50) या त्यांच्या दोन बहिणी होत्या. या तिघांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील समाधान लोहार या व्यक्तीने या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलिसांनी समाधान लोहार या संशयित आरोपीस ताब्यात घेतलंय. हेही वाचा - सोशल मीडियावर महिलांशी मैत्री, लग्नाचं आश्वासन; गोड बोलून पैसेही उकळले, अखेर… हत्येचे कारण समोर आलेले नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव घटनास्थळी दाखल झालेले असून याप्रकरणी मगंळवेढा पोलीस पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.