बीड, 06 मार्च : बीडमधून अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चालकाचा ताबा सुटून कार 200 फूट दरीत कोसळली. या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथिल महादेवदरा घाटात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात अंबादास पांडुरंग उगले (वय ४६ वर्षे) असे अपघातातील मृत शिक्षकाचे नाव आहे. ते कडा येथे चुलत सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी येत होते. (सॉ री आई-बाबा, अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; 17 वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल ) अंबादास पांडुरंग उगले हे गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे चुलत सासरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेवराई येथून ते कडा (ता.आष्टी) येथे पत्नी सगुणा अंबादास उगले (वय ४०) यांच्यासह फोर्ड कंपनीच्या कारने (क्रमांक एमएच-२३ एडी-०२४९) निघाले होते. बीडसांगवी घाटात आले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने अंबादास उगले यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट २०० फूट दरीत गेली. (वडील, बहीण घरात झोपलेले, दहावीच्या मुलाने रात्रीच्या सुमारास काढली कार अन्.., हादरवणारी घटना) हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला. या अपघातात अंबादास उगले यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सगुणा अंबादास उगले या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात 2 ठार दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावर खातिवली क्रॉसिंगजवळ दोन दुचाकी आणि एक टँकरचा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही तरुणाचा मृत्यू झाला. खतिवली क्रॉसिंगजवळ दोन्ही दुचाकीस्वारांना ओव्हरटेक करताना टँकरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. गजानन कठोले आणि कैलास भेरे अशी मयत झालेल्या तरुणाची नावं आहेत. दोघांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.