छत्रपती संभाजीनगर, 01 मार्च : अभ्यास करण्यावरून वडील रागावल्यानं मुलाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना गारखेडा इथे घडलीय. १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार गारखेडा परिसरातील स्वानंदनगर इथं घडला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थी अकरावीत शिकत होता अशी माहिती मिळाली आहे. तसंच घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटही सापडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करीत नसल्याने वडील मुलावर रागावले याचा राग धरून अकरावीत शिकणाऱ्या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. 'सॉरी आई बाबा मला माफ करा, आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही' असा मजकूर सुसाईड नोट मध्ये लिहून विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जेवण देण्याच्या बहाण्याने त्याने बोलावलं, मुंबईत 3 मुलांसोबत 43 वर्षाच्या नराधमाचं भयानक कृत्य
विद्यार्थी अकरावीत शिकत होता आणि पुढे १२ वीचे वर्ष असल्याने वडील त्याला अभ्यास करण्यावरून रागावले. यानंतर रागावलेल्या विद्यार्थ्याने घरात कोणी नसल्याचं पाहून टोकाचं पाऊल उचललं. आई गावाला गेली होती, तर वडील आणि बहीण कामावर गेले असताना सोमवारी रात्री त्याने घरात गळफास घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.