मराठी बातम्या /बातम्या /देश /

Don't Talk to me: 'राष्ट्रपत्नी' कमेंटवरून संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये इतकी जुंपली; इतर खासदारांना करावी लागली मध्यस्थी

Don't Talk to me: 'राष्ट्रपत्नी' कमेंटवरून संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये इतकी जुंपली; इतर खासदारांना करावी लागली मध्यस्थी

तापलेल्या वातावरणात संसदेत सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यात जोरदार वादावादी झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 28 जुलै: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपने काँग्रेस पक्षाला संसदेत घेरले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. तापलेल्या वातावरणात संसदेत सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यात जोरदार वादावादी झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे संसदेत राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्ष भाजपने काँग्रेसला यावरून चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजपचे खासदार लोकसभेत चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत. त्यातच स्मृती इराणी आणि सोनिया गांधी एकमेकींच्या समोर आल्यामुळे वादावादी झाली आहे.

Gandhi: महात्मा गांधींच्या बायोपीक सीरिजची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेते करणार दिग्दर्शन

नक्की काय घडलं

लोकसभेचे कामकाज 12 वाजता तहकूब झाल्यानंतर भाजप खासदार सोनिया गांधी राजीनामा द्या नारा देत होत्या. सोनिया गांधी घरातून बाहेर जात होत्या पण घोषणाबाजी करत असतानाच सोनिया गांधी परतल्या. रमादेवी यांच्याकडे गेल्या, अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे असं म्हणाल्या. दरम्यान, स्मृती इराणी म्हणाल्या की, त्या काही बोलल्या तेव्हा सोनिया जोरात म्हणाल्या माझ्याशी बोलू नकोस. यानंतर स्मृती आणि सोनिया गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. ही वादावादी 2 ते 3 मिनिटे चालली.

सुप्रिया सुळेंनी केली मध्यस्थी

सोनिया गांधी जेव्हा रमा देवी यांच्याशी बोलत होत्या, तेव्हा बिट्टू आणि गौरव गोगोईही तिथे उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया रमादेवीला सांगत होत्या की, माझे नाव का घेतले जात आहे? त्याचवेळी स्मृती इराणी तिथे आल्या आणि म्हणाल्या- मॅडम, मी तुम्हाला मदत करू शकते. स्मृती इराणी ,म्हणाल्या की मी तुमचे नाव घेतले होते. तेव्हा सोनिया मोठ्याने म्हणाल्या की माझ्याशी बोलू नका. प्रकरण तापत असल्याचे पाहून दोन्ही बाजूचे खासदार आले. घोषणाबाजी सुरू झाली. दरम्यान, गौरव गोगोई आणि सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केली.

'त्यांना स्वप्नात राहू द्या' एकनाथ शिंदेंनी काढली राऊतांच्या दाव्यातून हवा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सत्ताधारी बाकांजवळ गेल्यानंतर गोंधळ सुरू झाला. अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागावी अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. यामुळे भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमने सामने आले होते. त्यामुळे आता लोकसभेचे कामकाज 12 वाजता तहकूब करण्यात आले आहे.

First published:

Tags: Politics, Smriti irani, Sonia gandhi