सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 30 जानेवारी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाजपच्या काही कार्यक्रमांनाही पंकजा मुंडे गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता अशीच एक घटना घडल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. बीड जिल्ह्यातील मातब्बर क्षीरसागर कुटुंबातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर यांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. मात्र, पंकजा मुंडे यांनी अवघ्या काही क्षणातच काढता पाय घेत जाणं पसंत केलं. यामुळे क्षीरसागर यांच्यासोबत न घेतलेल्या चहाची चर्चा चांगलीच रंगली.
बीड जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघातील सर्व बूथवर जयदत्त क्षीरसागर यांची यंत्रणा तळ ठोकून आहे. बीड शहरातील चंपावती बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आलेले माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षिरसागर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची बूथ केंद्रावरच भेट घेतली. पंकजा मुंडे यांनी क्षीरसागर येताच काढता पाय घेतला. त्या अगोदर पंकजा मुंडे कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा चहा पिण्यासाठी बूथवर थांबल्या होत्या. मात्र, क्षीरसागर दाखल होताच पंकजा मुंडे चहा टाळून निघाल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात चहा दिला. गाडीमध्ये बसून चहा पीत पंकजा म्हणून निघून गेल्या. भारतभूषण क्षीरसागर आल्यामुळे पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेत गाडीमध्ये चहा घेणं पसंत केलं का? यावरून पंकजा मुंडे या क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
वाचा - माजी नेत्यांना मानाचे पान अन् पंकजा मुंडेंचा बॅनरवरून फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण
यावेळी पंकजा मुंडे चहा घेत गाडीमध्ये बसून पुढे निघून गेल्या तर माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी पॅनलमध्ये बसून चहा घेतला. या चहाची चर्चा चवीनं होत होती.
पंकजा मुंडे नाराज आहेत?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही महिन्यात 2 वेळा मराठवाड्यात गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातल्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहकारमंत्री अतुल सावेही यांचीही उपस्थिती होती. पण या कार्यक्रमात ज्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली त्या म्हणजे पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे. यामुळे पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Pankaja munde