मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed Rape Case : बीड जिल्हा हादरला! 24 तासांत दोन बलात्काराच्या घटना, महीला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Beed Rape Case : बीड जिल्हा हादरला! 24 तासांत दोन बलात्काराच्या घटना, महीला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

बीडच्या गेवराई पोलीस स्टेशन हद्दीत बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे. Beed Rape Case)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 31 ऑगस्ट : बीडच्या गेवराई पोलीस स्टेशन हद्दीत बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे. Beed Rape Case) माञ यामुळे महीला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलिला तोंडाला रुमाल बांधून दोघाजणांनी बळजबरीने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे.

तर दुसरी घटना गेवराई तालुक्यातील गढी येथील एका विवाहित महिलेसोबत घडली असून विवाहितेला शहराजवळील एका लाॅजवर नेत आत्याचार केला असल्याचा गुन्हा गेवराई पोलीसात दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपी अटक केले असुन पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 'आपण पैसे खाण्यासाठी बसलोय, जनता बदमाश आणि चोर आहे', ग्रामसचिव शिकवतोय सरपंचाला, भ्रष्टाचाराच्या गप्पांचा LIVE VIDEO

यादरम्यान दोघांपैकी एकाने महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला. या संतापजनक घटनेने गेवराई परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपी रोहित अभिमान आठवले व त्याचा साथीदार सय्यद फरहाण याला अटक केली.

आरोपींविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात, कलम 376 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेवराई पोलीस ठाण्यामध्ये आज एकाच दिवसांमध्ये, दोन बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्याने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातही धक्कादायक घटना उघडकीस

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका सहावर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करुन मुलीच्या गुप्तागावर नराधम आरोपीने वार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : Akola Government Hospital : अकोला शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार एकाच रुग्णाला वेगवेगळे रक्तगट दिल्याचा प्रकार

पीडीत मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. राज्यात मागील अनेक दिवसांपासून मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news, Rape, Rape case, Rape news, Rape on minor