अकोला, 31 ऑगस्ट : अकोला शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एक महिन्यापूर्वी एका महिलेला रक्ताची गरज होती. (Akola Government Hospital) यावेळी तिचे ब्लड चेककरून तिला रक्त चढवण्यात आले. एक महिन्यापूर्वी तिला ए पॉझिटिव्हचे रक्त देण्यात आले. दरम्यान एक महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा त्या महिलेला रक्ताची गरज भासल्यानंतर तिचा ब्लड ग्रुप चेक करण्यात आला यावेळी त्या महिलेचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह आला. एका महिन्यात दोन रक्त गट दिल्याने महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांचा गोंधळ झाला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने केलेल्या चुकीबाबत नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अकोल्याच्या शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी आलेल्या चंद्रकला बोधडे राहणार पंचगव्हाण यांना ब्लडची आवश्यकता होती. त्या अकोला शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना ब्लड ग्रुप चेक करण्यात सांगितले, त्यांचे ब्लड चेक करण्यात आले. मागच्या महिन्यात त्यांना ए पॉझिटिव ब्लड ग्रुपचे ब्लड देण्यात आले. तब्बेत बरी वाटल्याने त्यांना शासकीय रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
हे ही वाचा : शहरातील कोणतेही पोलीस ठाणे उडवून टाकणार औरंगाबाद पोलिसांना आलेल्या फोनमुळे खळबळ
मात्र एका महिन्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. यावेळी सुद्धा त्यांना ब्लडची आवश्यकता होती, मात्र यावेळी त्यांचे ब्लड चेक केले असता त्यांना ए बी पॉझिटिव्ह ब्लडचा रिपोर्ट देऊन डोनर आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र रुग्णासोबत त्यांची मुलगी वनमाला गवारगुरु या शिक्षित असल्याने त्यांच्या हे लक्षात आले. आधी ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह होता, दुसऱ्यांदा एबी पॉझिटिव्ह कसे होईल, अशी शंका त्यांना आल्यामुळे त्यांनी याची माहिती समाजसेवक व ब्लड डोनर सौरभ वाघोडे यांना दिली.
त्यांनी याबाबत शासकीय रुग्णालयातील ब्लड बँक संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. चक्क ब्लड ग्रुप बदल्याचा भोंगळ कारभार शासकीय रुग्णालयात उघड झाला आहे. उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये काही अशिक्षित सुद्धा असतात त्यामुळे, अश्याप्रकारे रुग्णांच्या जिवाशी खेळले जाते. या भोंगळ कारभारामुळे सौरभ वाघोडे यांनी रुग्णाच्या मुलीला वनमाला गवारगुरू यांना सोबत घेऊन अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभार विरोधात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा : Sangli Crime Fraud : तारण ठेवलेला माल विकला अन् राष्ट्रीयकृत बँकेला 17 कोटीला घातला गंडा
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या रुग्णाचा ब्लडग्रुप ए पॉझिटिव्ह असताना, रिपोर्ट एबी पॉझिटिव्ह देण्यात आल्याची कबुली खुद्द ब्लड बँकेने दिली आहे. मात्र या रुग्णाला एबी पॉझेटिव्ही रक्त दिले नसल्याचेही सांगितले. बऱ्याचदा एखाद्या रुग्णाने रक्त घेतलेलं असेल तर अश्या रुग्णामध्ये असे प्रॉब्लेम येतात याची कबुलीही त्यांनी दिली आहे. मात्र क्रॉसमॅचिंगच्यावेळी रक्त व्यवस्थित तपासून दिलं जात असंही रक्तपेढी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.