जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बळीराजाचा ‘युवराज’ पोहोचला अमेरिकेत, नासामध्ये करणार एंट्री!

बळीराजाचा ‘युवराज’ पोहोचला अमेरिकेत, नासामध्ये करणार एंट्री!

बळीराजाचा ‘युवराज’ पोहोचला अमेरिकेत, नासामध्ये करणार एंट्री!

बळीराजाचा ‘युवराज’ पोहोचला अमेरिकेत, नासामध्ये करणार एंट्री!

बीडमधील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी युवराज सानप यानं मोठं यश मिळवलंय. लवकरच तो अमेरिकेतील नासामध्ये जाणार आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 26 जुलै: लहानपणी आकाशात दिसणारा चंदामामा सर्वांनाच जवळचा मित्र वाटतो. याबाबत बालकथांतून भेटणाऱ्या चंद्राबाबत अनेकांच्यात कुतुहलही असतं. पुढे शाळेत गेल्यानंतर हे कुतुहल अधिक वाढतं आणि याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो. बीड जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अंतरिक्षाचा अभ्यास करणाऱ्या इस्रो आणि नासा भेटीची संधी मिळाली आहे. आता बीडमधील शेतकरी पुत्र युवराज सानप हा अमेरिकेतील नासा भेटीसाठी जाणार आहे. शेतकरी पुत्र करणार अमेरिका दौरा बीड जिल्हा परिषदेने निवडलेल्या अकरा विद्यार्थ्यांत बीड तालुक्यातील खोकर मोहा जिल्हा परिषद शाळेतील युवराज सानप हा शेतकरी पुत्र आहे. युवराजच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. वडील पांडुरंग सानप आणि आई शेतीच करतात. युवराज हा आई-वडिलांना शेती कामात मदत करत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. नेहमी आकाशात विमान उडताना पाहणारा युवराज विमानात बसायला मिळणार असल्याने खूश आहे.

News18लोकमत
News18लोकमत

स्पर्धात्मक परीक्षेत यश युवराजने पहिलीपासून आठवीपर्यंत खोकर मोहा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. सध्या तो नववीत शिकत आहे. लहानपणापासूनच त्याला अभ्यासाची आवड असून एक हुशार विद्यार्थी अशीच त्याची ओळख राहिली आहे. शालेय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत त्यानं आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. नासा भेटीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठे यश संपादित करत युवराज आता अमेरिका भेटीसाठी निघाला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खगोलशास्त्राची आवड युवराजला लहानपणापासूनच चंद्र, तारे, सूर्य आणि खगोलशास्त्राची आवड आहे. या परीक्षेमध्ये तो जिल्ह्यात प्रथम आला आहे आणि त्याला आता अमेरिकेतील नासा या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आहे. त्याला आधीपासूनच खगोलशास्त्राचा अधिक अभ्यास होता आणि तीच उत्सुकता लक्षात घेऊन तो आता जगातील सर्वात मोठी अंतरिक्ष संशोधन संस्था नासाला भेट देणार आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे युवराजचे वडील शेतकरी पांडुरंग सानप सांगतात. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची नासा वारी, पाहा कशी मिळाली संधी? बीड जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम बीड जिल्हा परिषदेने शालेय विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा भेटीची संधी उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील शाळांतून स्पर्धात्मक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा भेटीसाठी अकरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे पासपोर्ट तयार झाले असून लवकरच हे विद्यार्थी अमेरिकेला रवाना होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात