बीड, 23 मार्च : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लहान बाळांचे नामकरण करण्याचा शुभदिवस समजला जातो. मात्र बीड जिल्ह्यातील चोपनवाडी येथिल शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बोकडाचे नामकरण केले आहे. विशेष आठ महिन्याच्या या बोकडाचे लहान बाळांच्या नामकरण सोहळ्याप्रमाणे अत्यंत उत्साहात बोकडाचा नामकरण सोहळा काल (दि.22) रात्री पार पडला. दरम्यान या घटनेची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली आहे. याचबरोबर या सोहळ्याचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होत आहे.
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी गावचे विठ्ठल डीसले या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून व शेळीपालनाची आवड असल्याने शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. यातच त्यांनी नऊ महिन्याचा बिटल जातीचा बोकड सत्तर हजार रुपयांत खरेदी केला. जसे आपण आपल्या कुटुंबातील लहान मुलांचे नामकरण करतो. अगदी तसेच या बोकडाचे नामकरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचा संकल्प डीसले यांनी केला.
वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते... पाहा Video
काल सकाळी गुढी उभारून दुपारी स्वतःच्या शेतात हा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. बोकडाच्या गळ्यात पुष्पहार, पितळाची जाड साखळी, समोरच्या दोन्ही पायात पितळाचे तोडे, शरीराला चार-पाच ठिकाणी फित बांधून त्याला सजवण्यात आले. त्यानंतर घरातील व शेजारील महिलांनी गंध, गुलाल वाहून पंचारती ओवाळून बोकडाचे औक्षण केले.
अजगराचं फुगलेलं पोट पाहून गावकऱ्यांनी कापायचा घेतला निर्णय आणि...
या लाडक्या बोकडाचे 'चेतक' असे नामकरण जाहीर करण्यात आले. या सोहळ्याला डीसले परिवारातील महिला, लहान मुले, शेजारील शेतकरी व शेळीपालन व्यवसाय करणारे सहभागी झाले होते. नामकरण सोहळ्यानंतर अल्पोपहाराचीही सोय डीसले परिवाराने केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.