जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखाची गाडी फोडली!

सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखाची गाडी फोडली!

सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंचे शिवसैनिक भिडले

सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंचे शिवसैनिक भिडले

महाप्रबोधन यात्रेच्या सभेआधीच बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला आहे.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 18 मे : महाप्रबोधन यात्रेच्या सभेआधीच बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला आहे. बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सभेच्या ठिकाणची पाहणी करतानाच शिवसैनिकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची गाडी फोडण्याचा प्रकार घडला आहे. उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाचीतून हा वाद विकोपाला गेला, पण अजूनही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सुषमा अंधारे यांच्यासमोरच हा राडा झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता, शेवटी सुषमा अंधारे यांनीच मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या गाडीची काचही या राड्यात फुटली आहे. पवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा वार, आता राष्ट्रवादीकडून पलटवार शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान गैरसमजातून वाद झाला असून हा वाद आता मिटलेला आहे, असं जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात