रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 30 मार्च : जिद्द, चिकाटी आणि तीव्र इच्छाशक्ती या 3 गोष्टी असतील तर कोणत्याही भागातील व्यक्ती शिखरापर्यंत नक्की पोहचते. राज्यातील ग्रामीण भाग समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील अनेक तरुण या जोरावर विविध क्षेत्रामध्ये नाव गाजवत आहेत. बीडच्या या परंपरेत माजलगावच्या अंतरानं भर घातलीय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या जगातील प्रतिष्ठित संस्थेत इंजिनिअर म्हणून अंतराची निवड झालीय.
शेतकऱ्याच्या मुलीची भरारी
अंतरा बाळकृष्ण कुलकर्णी असं या यशस्वी तरुणीचं नाव आहे. अंतरा माजलगावची रहिवाशी आहे. तिचे वडील शेती करतात. तर आई ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. बाळकृष्ण यांनी शेतीमध्ये मोठे कष्ट घेऊन अंतराला शिकवलं. अंतरानंही या कष्टाचं चीज करत या प्रतिष्ठीत संस्थेमध्ये नोकरी मिळवलीय.
मराठवाड्यातील छोट्या खगोलशास्त्रज्ञानाला मिळणार मोठी संधी, पाहा Video
महाराष्ट्रातील एकमेव
अंतरानं दहावीपर्यंतचं शिक्षण माजलगावच्या सिद्धेश्वर विद्यालयात पूर्ण केलं. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण लातूरमध्ये घेतलं.सिव्हिल इंजिनियरची पदवी मिळाल्यानंतर तिनं या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. इस्रोनं यंदा घेतलेल्या परीक्षेत यशस्वी झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव तरुणी आहे.
बीडमध्ये मुलीही करणार नळजोडणी, पहिल्यांदाच दिसणार 'महिला प्लंबर', Video
'माझी लहाणपणी पायलट होण्याची इच्छा होती. 'इस्रो' कडून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगाचं मी नेहमी वाचन करत असे. इंजिनिअर झालेलं विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करतात. मला देशासाठी काहीतरी करायचं होतं. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास केला आणि माझी संस्थेत निवड झाली आहे,' असं अंतरानं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Isro, Local18, Success story