जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोलीस स्टेशनसमोरच झोपले खडसे, 16 तासांपासून आंदोलन सुरूच, काय आहे प्रकरण?

पोलीस स्टेशनसमोरच झोपले खडसे, 16 तासांपासून आंदोलन सुरूच, काय आहे प्रकरण?

 संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला

संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला

संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला

  • -MIN READ
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 14 ऑक्टोबर : जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले आहे. गेल्या 16 तासांपासून एकनाथ खडसे पोलीस स्टेशनला ठिया मांडल्यानंतर शहर पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर आंदोलन सुरू केले. रस्त्यावरच एकनाथ खडसे यांनी रात्री मुक्काम केला. न जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा एकनाथ खडसे यांनी पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैर व्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचं म्हटलं आहे. मात्र 16 तास ठिय्या मांडूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला असून जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशारा एकनाथ खडसे यांनी आता पोलिसांना दिला. ( Andheri East Bypoll : शिदेंचं एक पाऊल मागे, शिवसेनेशी थेट टक्कर टळली, पण… )_ खडसेंनी रात्रभर शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर तीन टाकून आंदोलन केलं. आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या आंदोलना ठिकाणी भेट देऊन यासंदर्भात सखोल माहिती जाणून घेणार आहे. (Andheri East Bypoll : ऋतुजा लटकेंना उमेदवारी, ‘महाविकासआघाडी’चं शक्तीप्रदर्शन, 7 नेते मैदानात!) दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने राजकीय दबावापोटी पोलीस हा गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप खडसेंनी केला  शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रात्री 12 वाजता पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे निवेदन स्वीकारले आहे. मात्र अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला. तसेच पोलीस स्टेशन बाहेर एकनाथ खडसे यांचे ठिया आंदोलन सुरू असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा एकनाथ खडसे यांनी घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात