बीड, 04 मार्च : घरा घरात पाणी देणारा नेता पाहिजेत की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे, असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तसंच, चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातली व्हिलन असते, अशी उपाधीही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिली. बीडच्या परळी येथील कौठळी गावात जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ सोहळा पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. परळी शहरातील भुयारी गटारयोजनेच्या नावाखाली चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला. तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे तर तुम्हाला भूषण वाटावे अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की,पुढची पिढी वाया घालवणार नेता पाहिजे. घरा घरात पाणी देणारा नेता पाहिजेत की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. (‘निवडणूक आयोग भोस..’ संजय राऊत निवडणूक आयोगावर घसरले; म्हणाले 50 वर्षांपूर्वी..) ‘मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे कोणाचं नाव घेता माझं, कारण तुम्हाला कुशल अन् चांगला नेता तुम्हाला पाहिजे. मी निवडणुकीमध्ये हरले तेव्हापासून तुमच्या मोबाईलवरचे मेसेज येणं बंद झाले. पैसे वाटणारा,तमाशा दाखवणारा,मत विकत घेणारा भ्रष्टाचार करणारा ,खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहीन व्यक्ती ही राजकारणातील व्हिलन असते, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला. ( राहुल गांधींनी मोदी सरकारच्या दोन योजनांचं केंब्रिज युनिव्हर्सिटीत केलं कौतुक ) तसंच केंद्र सरकारची योजना आणि राज्यात सरकार आमचं तरी दुसरेच आमच्या योजनेच उद्घाटन करण्यास पुढे येतात, असं म्हणत विकासाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.